mobile theft esakal
जळगाव

Crime News : एक फोन करू देणे तिला पडले महागात; फोन करण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा मोबाईल लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘प्लीज एक फोन करू द्या ना’, असे म्हणत विद्यार्थिनीचा मोबाईल एका महिलेने घेतला. फोनवर बोलण्याचे नाटक करत मोबाईल घेऊन ही महिला दुचाकीस्वारासोबत बसून पसार झाली. ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवकॉलनी पेट्रोलपंपाजवळ घडली.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

कबचौ विद्यापीठाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेली विद्यार्थिनी रेवती पावरा ही मु. जे. महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेअकराच्या सुमारास ती मु. जे. महाविद्यालयाकडून शिवकॉलनीकडे जात होती. शिवकॉलनीजवळील पेट्रोलपंपाजवळ तिला दुचाकीवरून आलेल्या पुरुष व महिलेने थांबविले.

‘प्लीज एक कॉल करू द्या ना तुमच्या मोबाईलवरून’, अन् ते फरार

‘प्लीज एक कॉल करू द्या ना तुमच्या मोबाईलवरून’, असे सांगत तिच्याकडून मोबाईल मागितला. बोलत असल्याचे नाटक करून दुचाकीवरील पुरुष व महिला मोबाईल घेऊन फरारी झाले. नंतर विद्यार्थिनीने रामानंदनगर पोलिसांत तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT