Mahavitran News
Mahavitran News esakal
जळगाव

Jalgaon News : वीजचोरी कारवाईत अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मीटरमध्ये फेरफार किंवा आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात ‘महावितरण’ची धडक मोहीम सुरू आहे. या कारवाईत अडथळे आणणाऱ्या तसेच वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनीही सहकार्य करावे, तसेच अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करण्यात आले आहेत. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. (Crimes Registered against those obstructing operation of power theft Jalgaon News)

या २३० फीडरमध्ये जळगाव शहरातील विठ्ठलपेठ फीडरचा समावेश आहे. या फीडरवर जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रीडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व २१ नोव्हेंबरला मोहीम हाती घेऊन कारवाई केली.

त्यात ५२ जणांची वीजचोरी पकडण्यात आली तर २१२ आकडे काढण्यात आले. या ग्राहकांना वीजचोरीची रीतसर बिले देण्यात आली. मात्र अनेक ग्राहकांनी बिले न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी ९ डिसेंबरला महावितरणच्या जोशीपेठ कक्षाचे सहाय्यक अभियंता उमाकांत पाटील व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गेले. मात्र जमावाने त्यांना घेराव घालून कारवाईत अडथळा आणला.

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

वीजगळती रोखणे आवश्यक

जळगाव शहर व जिल्ह्यात वीजगळतीचे प्रमाण अधिक असल्याने गत उन्हाळ्यात आपत्कालीन भारनियमन करण्याची वेळ आली होती. त्यामुळे आणिबाणीचे भारनियमन रोखायचे असल्यास ग्राहकांनी अधिकृत जोडणी घेऊनच वीज वापरावी, असे महावितरणने म्हटले आहे. वीजचोरी रोखल्यास संबंधित फीडरवर भारनियमनाची वेळ येणार नाही.

वीजचोरीमुळे ट्रान्स्फॉर्मरचा लोड वाढून ते फेल होण्याचे तसेच तारा तुटण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे तेथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्राहकांनी याचा सारासार विचार करून अधिकृत वीज वापरावी आणि नियमित वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT