crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : एरंडोलचा सराईत गुन्हेगार नाना कोळी स्थानबद्ध; येरवाडा कारागृहात वर्षभरासाठी रवानगी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : दिवाळी संपताच जिल्‍हा पोलिस दलाने पुनश्च हद्दपारी अन्‌ स्थानबद्धतेच्या कारवाईला सुरवात केली आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या यादीनुसार कारवाई करताना पहिल्याच क्रमांकावर एरंडोल तालुक्याचे नाव असून, सराईत गुन्हेगार नाना ऊर्फ बुधा उत्तम कोळी (वय ३२, रा. रवंजे, ता. एरंडोल) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ अर्थात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.(criminal naa koli go to Yerwada Jail for one year jalgaon crime news)

पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगारांच्या वाढत्या गुन्ह्याचा आलेख पाहता रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे पुन्हा एकदा पोलिस दलाने लक्ष केंद्रीत केले आहे. पोलिस ठाण्यातून आलेल्या कुंडल्या धुंडाळून तयार झालेल्या यादीतून दिवाळीनंतरच्या पहिल्याच कारवाईचा मान एरंडोल तालुक्याने पटकावला.

जिल्हा पोलिस अक्षीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या सूचनेवरून एरंडोलचे निरीक्षक सतीश गोराडे यांनी कारवाईचा प्रस्ताव गुन्हे शाखेला रवाना केला.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसन नजन-पाटील आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनी दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील अशांच्या पथकाने अंतिम प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षकांना सादर केला.

त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार अनेक गुन्ह्यांत सहभागी सराईत गुन्हेगार कोळी याला ताब्यात घेतल्यावर जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. एक वर्ष स्थानबद्धतेच्या प्रस्तावावर स्वाक्षरी होऊन संशयिताला ताब्यात घेत कारागृहात रवाना करण्यात आले.

कोळीविरुद्ध दहा गुन्हे

कोळी याच्याविरुद्ध एरंडोल, धरणगाव आणि जळगाव शहर पोलिसांत गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, एरंडोल पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चार वेळेस प्रतिबंधाकात्मक कारवाई केली आहे.

पुण्याला रवानगी

कोळी याला निरीक्षक सतीश गोराडे (एरंडोल), सहाय्यक निरीक्षक गणेश आहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, विकास देशमुख, राजेश पाटील, अनिल पाटील, अकील मुजावर, मिलिंद कुमावत, प्रशांत पाटील, पंकज पाटील अशांनी ‘एमपीडीए’वर शिक्कामोर्तब होताच रीतसर अटक करून त्याची पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT