crowd of artisans to make bolke for makar sankranti festival 2024 nashik news ( file photo )_ esakal
जळगाव

Makar Sankranti 2024 : बोळके बनविण्यासाठी कारागिरांची लगबग; मकर संक्रांतीनिमित्त वाढती मागणी

मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी महिलांना लागणारे बोळके, सुगड बनविण्याची लगबग सध्या कुंभार व्यावसायिकांमध्ये सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी महिलांना लागणारे बोळके, सुगड बनविण्याची लगबग सध्या कुंभार व्यावसायिकांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे कुंभार समाजातील नवी पिढी या व्यवसायात उत्साहाने सहभागी झाली आहे.

ग्रामीण भागात सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. (crowd of artisans to make bolke for makar sankranti festival 2024 nashik news)

सणातून रूढी-परंपरा जपण्याकडे अनेकांचा कल असतो. संक्रांतीचा सण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता सण. ‘तीळगूळ घ्या... गोड गोड बोला’, असा संदेश देत एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, आदर व्यक्त करण्याची संधी यातून मिळते. महिलांसाठी हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात.

हे वाण ज्या मातीच्या भांड्यांमधून दिले जाते, ते बोळके, सुगड बनविण्याची सध्या लगबग कुंभार व्यावसायिकांमध्ये सुरू आहे. येवला तालुक्यात सुगडी आणि बोळकी मोठ्या प्रमाणात बनवली जात आहेत. संक्रांतीनिमित्त या कामांना वेग आला असून, कुटुंबातील इतर सदस्यही मदत करीत आहेत.

संक्रांतीच्या दिवसांत बोळक्यांना भरपूर मागणी असते. त्यामुळे दिवाळीनंतर वर्षातला हा एकच सण कुंभारांच्या आयुष्यात गोडवा आणतो. मात्र, ज्या प्रमाणात महागाई वाढत आहे, त्या प्रमाणात सुगड्यांची किंमत मात्र वाढत नाही, अशी खंत पिंपळगाव जलाल येथील कुंभार रघुनाथ वाघ यांनी व्यक्त केली. वाघ यांचा मातीची भांडी बनविण्याचा व्यवसाय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT