Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दिवसा घरफोडी करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरातील बंद घर चोरट्यांनी चक्क दिवसा फोडून चोरट्याने लाखोंचा ऐवज लंपास केला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून एका सराईत चोरट्याला तांबापुऱ्यामधून अटक केली असून, त्याने या गुन्ह्याची कबुलीसह आपल्या साथीदाराची माहिती पाोलिसांना दिली आहे.

पिंप्राळा परिसरातील सोनीनगरात हेमंत सूर्यवंशी कुटुंबासह वास्तव्यास असून, ते खासगी नोकरी करतात. दिवाळीच्या सुटीनिमित्त सूर्यवंशी कुटुंबीय १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान नांदेड, माहूरगड येथे गेले होते. गावी जाताना त्यांनी शेजाऱ्यांना घरावर लक्ष ठेण्याबाबत सांगितले होते.(Daytime burglar arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

सोमवारी (ता. ७) दुपारी सूर्यवंशी कुटुंबीय घरी परतले असता, त्यांना घराच्या सर्व दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा कापलेल्या अवस्थेत आढळून आले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाट आणि देव्हाऱ्यातील २१ हजारांचे सोने-चांदीचे दागिने, ३० हजारांची रोकड, एक मोबाईल, एक लॅपटॉप, असा ऐवज लंपास केला.

याबाबत हेमंत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजनपाटील यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना केली होती.

मौजमजा करून साथीदार फरारी

गुन्हे शाखेच्या पथकाने संशियताला तांबापुऱ्यातील श्‍यामा फायर चौकातून ताब्यात घेतले. संशयित इस्तियाकअली राजीकअली (वय १९) याला गुन्हे शाखेत प्रसाद मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या साथीदाराचे नावही सांगून टाकले. मात्र, पिंप्राळ्यातील हेमंत पाटील यांच्याकडील चोरीतून मिळालेल्या दागिन्यांची मोड विकून गेल्या महिन्याभराचा खर्च भागविला, तर मिळालेल्या ३० हजारांची रोकड मौजमजेत उडवून दिल्याचे त्याने सांगितले. अटकेनंतर संशयितांला रामानंदनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT