arrest esakal
जळगाव

तोंडावर बिअरबॉटल फोडत प्राणघातक हल्ला करणारी टोळी गजाआड

मागील भांडणाचा वाद उकरुन काढत या टोळीने तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मागील भांडणाचा वाद उकरून तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सहापैकी पाच संशयितांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. फरार संशयिताचा शोध सुरु आहे. (Crime news)

हर्षल राजेंद्र सोनवणे व त्याचा साथीदार समाधान सुनील पवार असे दोघे जण २ जुलै रोजी मोटारसायकलने कुसुंबा येथून जळगावच्या दिशेने येत होते. वाटेत रायपूर फाट्याजवळ करण चंद्रशेखर पाटील (रा. गणपतीनगर), तुषार प्रमोद कोळी (रा. दत्त मंदीरामागे कुसुंबा), अमित अशोक तडवी (रा. कुसुंबा), सुनील उर्फ सोन्या गुलाब चव्हाण (रा. स्वामी समर्थ केंद्राच्या मागे), सागर तिरसिंग पाटील (रा. कुसुंबा), गणेश उर्फ विक्की गोसावी व इतर अशा सर्वांनी हर्षलची मोटारसायकल अडवली. (Latest marathi news)

मागील भांडणाचा वाद उकरुन काढत सर्वांनी हर्षल यास शिवीगाळ सुरु केली. करण, तुषार, अमित, सनील, सागर, गणेश व इतरांनी त्यांच्या हातातील केबलच्या प्लॅस्टीक पाईप व लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवत तोंडावर बिअरबॉटल मारुन चेहरा विद्रृप केला. जखमीवर जिल्‍हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या जबाबावरून दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी यातील करण, तुषार, अमित, सुनील, सागर अशा पाच संशयितांना अटक केली. गणेश उर्फ विक्की गोसावी हा फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. अटकेतील सर्वांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate: शेअर बाजारात जोरदार वाढ; तर सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजचा भाव

Vi Recharge : फक्त 1 रुपयांत जिंका 4999 वाला रिचार्ज; 'या' बड्या कंपनीची जबरदस्त ऑफर, यूजर्सचा फायदाच फायदा

Chhagan Bhujbal : मराठा समाज ओबीसीत येऊ शकत नाही; छगन भुजबळांचा स्पष्ट इशारा

Kolhapur Dahihandi: ‘नृसिंह गोविंदा’ तीन लाखांचे मानकरी; सात मनोरे रचून फोडली धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी

Ganesh Festival 2025 : पूजा साहित्य आणि फुलांच्या खरेदीसाठी पुण्यातील बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT