child death esakal
जळगाव

Jalgaon News : मूळगावी जाताना महिन्याच्या बाळाच्या रेल्वेतील मृत्यूने दाम्पत्याचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सुरतहून मुळगावी झारखंडमध्ये जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या दांपत्याच्या एक महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाला.

मूलबाळ होत नसल्याने दत्तक घेतलेल्या बालिकेला हिरावल्याने दाम्पत्याने आक्रोश केला. हे दाम्पत्य धरणगावमार्गे रेल्वेने प्रवास करत असताना ही घटना नुकतीच घडली. (Death of couple adopted baby girl in railway jalgaon news)

भुसावळ रेल्वे पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राबिया हुमायू अन्सारी (रा. झारखंड हल्ली मुक्काम सुरत-गुजरात) असे मृत बालिकेचे नाव आहे. रेल्वे पेालिसांनी दिलेल्या माहितीनुसार झारखंडमधील रहिवासी हुमायू अन्सारी (वय ३०) हे पत्नी गुडीया यांच्यासह सुरत (ता.गुजरात) येथे कामगार म्हणून कार्यरत आहेत.

रेडीमेड कापड कारखान्यात ते नोकरीला आहेत. विवाह झाल्यापासून १० वर्षापर्यंत अन्सारी दांपत्याला अपत्य नव्हते. म्हणून हुमायू यांनी शालकाची एक महिन्याची मुलगी दत्तक घेतली होती.

नुकतेच ते झारखंडला जाण्यासाठी सुरत येथून रेल्वेने निघाले होते. प्रवासात मध्यरात्री धरणगाव येथून रेल्वे जात असताना चिमुरडी राबियाची प्रकृती अचानक खराब झाल्याने औषधोपचारासाठी अन्सारी दांपत्य भुसावळ रेल्वेस्थानकावर गाडी आल्यावर प्रवास थांबवून उतरले.

भुसावळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबियाला दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यावर बालिकेला मृत म्हणून घोषित केले. हे समजताच, दाम्पत्याने आक्रोश केला होता. सकाळी अकराला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT