Suicide esakal
जळगाव

जळगाव : कर्जबाजारी शेतकऱ्याची आव्हाणेत आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळी घडली. प्रमोद भागवत पाटील (वय ३७, रा. आव्हाणे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरडी (ता.जि. धुळे) येथील मूळ रहिवासी प्रमोद पाटील पत्नी व मुलासह आव्हाणे (ता. जळगाव) गावात वास्तव्याला होते. लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्याने ते आव्हाणे येथे मामाच्या गावाला राहायला आले. आपल्या थोड्याशा शेतीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अक्षयतृतीयेनिमित्त पत्नी आरती मुलगा मनीषसोबत माहेरी गेल्या असताना घरी एकट्याच असलेल्या प्रमोदने सोमवारी सायंकाळी पाचच्या पूर्वी गळफास घेतला. शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली. मृतदेह उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. कर्जबाजारीतून त्यांनी आत्महत्या केल्याचे आप्तस्वकीयांकडून सांगण्यात आले. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे तपास करीत आहेत. त्यांच्या मागे मोठा भाऊ गजानन, पत्नी आरती आणि मुलगा मनीष असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT