Highway esakal
जळगाव

जळगाव : नव्याने तयार झालेल्या महामार्गावर तडे बुजविण्याचा टाइमपास

तरसोद ते चिखली दरम्यान नव्याने तयार केलेल्या महामार्गावर तब्बल महिन्याभरापासून तडे पडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तरसोद ते चिखली दरम्यान नव्याने तयार केलेल्या महामार्गावर तब्बल महिन्याभरापासून तडे पडले आहेत. महामार्ग प्राधिकरणाने तडे पडलेला महामार्ग तब्बल महिन्याभरापासून बंद केला आहे. मात्र तडे बुजवून महामार्ग चांगला करण्याचे काम अद्यापही सुरू केलेले नाही. केवळ ‘टाइमपास’ करून टोल वसुली करीत असल्याचा आरोप वाहनधारक करू लागले आहेत.

महामार्गावर २८ मेस अचानक पडलेल्या तड्यांनी वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रकार वाढले होते. महामार्गावर सुसाट वेगाने वाहने धावतात. महामार्गावरील तड्याच्या ठिकाणी गाडी येताच चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते. तो कशीबशी गाडी नियंत्रित करतो. मात्र तड्याच्या ठिकाणी असलेल्या अणकुचीदार खडीमुळे वाहनाची चाके पंक्चर होताहेत. यावरून महामार्गाचे काम कशा दर्जाचे झाले असेल, याची कल्पना येते. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच, तडे पडलेला भागावर डांबरीकरण करून बुजविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात पहाता तडे पडलेला भागाचा रस्ता महिन्याभरापासून बंद करून वाहतूक साइड रोडमार्गे वळविण्यात आली आहे. प्रत्यक्षात तडे बुजविण्याचे काम लागलीच करणे गरजेचे होते. महामार्ग प्राधिकरण कामांबाबत केवळ टाइमपास करून टोल वसुली करीत असल्याचा आरोप वाहनधारक करीत आहेत.

कामे अपूर्णच

तरसोद ते चिखली दरम्यान अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. नशिराबादजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूने पूर्णत: काम अपूर्ण आहे. एकाच बाजूने अपडाऊनची वाहने ये-जा करतात. रात्री या ठिकाणी पथदिवे नाही. परिणामी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भुसावळ रेल्वे उड्डाणपुलाचेही एका बाजूचे काम अपूर्ण आहे. येथे पथदिव्यांचे पोल उभारले आहेत. त्यातील दोनच पथदिवे सुरू आहेत. इतर पथदिवे बंद आहेत. रात्री येथे अंधार असतो. भुसावळ शहरात जाणारी, महामार्गावरील इतर वाहनांची रात्री येथे कोंडी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT