While inspecting the work of the dam, Deputy Chief Minister Ajit Pawar
While inspecting the work of the dam, Deputy Chief Minister Ajit Pawar esakal
जळगाव

Jalgaon News : पाडळसरेचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणारच : उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी पाडळसरे धरणाचे काम २०२५ पर्यंत पूर्णत्वास आणण्याचा महायुती सरकारचा मानस आहे. या प्रकल्पाला कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

मंत्री अनिल पाटील यांच्या रूपाने मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलत असून आगामी लोकसभा निवडणुकीत आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा कशा निवडून येतील यासाठी साथ द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथे केले. (Deputy Chief Minister Ajit Pawar statement Padalsare work will be completed by 2025 jalgaon news)

साहित्य संमेलनासाठी अजित पवार अमळनेर येथे आले होते. सकाळी आठला अमळनेरात आल्यावर त्यांनी वेळ काढत पाडळसरे धरणावर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. प्रकल्पाची पूर्ण माहिती जाणून काही सूचना केल्या.

त्यानंतर सभास्थळी ते बोलत होते. व्यासपीठावर पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता भदाणे उपस्थित होते.

श्री. पवार पुढे म्हणाले, आम्ही सरकारमध्ये सामील झालो नसतो तर पाडळसरे धरणाला विलंब झाला असता. जळगाव व धुळे जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता यावी, ५ सरकारी उपसा सिंचन योजना व २ सहकारी उपसा योजना सरकारच्या ताब्यात घेऊन त्या सुरू करण्यासाठी केंद्राची मदत लागेल.

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या तिन्ही राज्यात नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे तापीच्या पाणी वाटपाचा प्रश्न अभ्यास करून व चर्चा करून सोडवला जाईल. अनिल पाटील म्हणाले, निम्न तापी प्रकल्प हा जळगाव धुळे जिल्ह्यातील गावांसाठी कायापालट करणारा ठरणार आहे.

सुप्रमा मिळाल्याने आणि निधी मिळणार असल्याने आजूबाजूच्या गावात शेतकऱ्यांच्या घरात जी भाकरी खाल्ली जाईल त्यावर अजित पवारांचे नाव असेल. एसएफसी मान्यता मिळाली आहे, केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

२०२५ पर्यंत धरणाचे काम पूर्ण होईल. लवकरच उपसा सिंचन योजनेचे टेंडर काढले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी, महेंद्र बोरसे, संजय पाटील, रणजित शिंदे यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. विनोद कदम यांनी सूत्रसंचालन केले.

क्रीडा संकुलाचे भूमिपूजन

क्रीडा संकुलाच्या उर्वरित ३ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, अनिल पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी निवेदन दिले. यासंदर्भात चर्चा झाली असून जीआर मध्ये तरतूद करण्यात येणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT