Deputy Chief Minister Devendra Fadnavis speaking at the campaign rally of BJP candidate Archana Chitnis. Crowd in front. 
जळगाव

Devendra Fadnavis: ‘मेगा रिचार्ज’चे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

Devendra Fadnavis : जळगाव, बुलडाणा जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शाहपूर या पट्ट्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या महत्त्वाकांक्षी मेगा रिचार्ज योजनेचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचा पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील शाहपूर येथे बोलताना केली. (Deputy CM Devendra Fadnavis statement Mega Recharge work in final stage of approval jalgaon news)

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व माजी मंत्री अर्चना चिटणीस यांच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते.

फडणवीस यांनी सांगितले, की जगातील आश्चर्य ठरेल, अशी ही मेगा रिचार्ज योजना आहे. तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत आपण या योजनेसाठी हवाई सर्वेक्षण केले असून, योजना पूर्ण झाल्यावर उत्तर महाराष्ट्रासह बऱ्हाणपूर व शाहपूर पट्टा सुजलाम् सुफलाम् होईल.

२०१८ मध्ये अर्चना चिटणीस पराभूत झाल्यावर आणि २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार गेल्यावर या योजनेसाठी पाठपुरावा कमी पडला. मात्र आता महाराष्ट्रात आपण पुन्हा सत्तेवर आलो असून, मध्य प्रदेशमध्येही भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा आल्यास या योजना मंजुरीसाठी बळ मिळेल.

ही योजना सध्या केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केली असल्याची ही माहिती त्यांनी दिली. या वेळी अर्चना चिटणीस यांनी या मेगा रिचार्ज योजनेतून साडेतीन लाख हेक्टर्स क्षेत्र ओलिताखाली येणार असून, योजनेचा विस्तृत योजना अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आल्याची माहिती दिली.

या वेळी व्यासपीठावर जळगावचे खासदार उन्मेष पाटील, खासदार ज्ञानेश्वर पाटील (बऱ्हाणपूर) जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते कुंदन फेगडे, पी. के. महाजन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT