Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : जादा फलक लावणाऱ्यांवर कारवाई; महापालिकेची 1 एप्रिलपासून धडक मोहीम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेत कमी जाहिरात फलक लावण्याची परवानगी घेतली जाते. प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा अधिक फलक रस्त्यावर लावले जातात.

याविरुद्ध महापालिकेतर्फे धडक कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे. (dhadak campaign of Municipal Corporation from April 1 against people putting extra board jalgaon news)

जळगाव शहरामध्ये नागरिक व व्यावसायिकांनी जाहिरातीचे फलक (होर्डिंग्ज) विनापरवानगी लावल्याचे दिसून येत आहे, तसेच जाहिरात फलकधारकांनी, होर्डिंगधारकांनी महापालिकेची होर्डिंग लावण्यासंदर्भात परवानगी घेतली आहे.

मात्र, जाहिरात फलक लावण्याची प्रत्यक्ष मागणी मंजूर संख्या व प्रत्यक्ष मंजूर संख्येपेक्षा जास्त जाहिरात फलक लावल्याचे आढळून आल्यास, अशा जाहिरात फलकधारकांचे होर्डिंग जप्तीची मोहीम शनिवार (ता. १)पासून राबविली जाणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तद्‌नंतर अशांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार कारवाई केली जाणार आहे. याची संबंधित जाहिरात फलक (होर्डिंग) लावणारे नागरिक व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी.

कोणी विनापरवानगी जळगाव महापालिकेच्या कार्यक्षेत्रात जाहिरात फलक, होर्डिंग लावले असतील, अशांनी व जाहिरात परवानगी मागणी संख्येपेक्षा जास्त जाहिरात फलक लावलेले असतील, अशांनी आपले फलक तत्काळ काढून घेण्याची व्यवस्था करावी, असे जळगाव शहर महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT