'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून sakal
जळगाव

धुळे : 'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून

प्रियकराला दोन दिवस पोलिस कोठडी, ४८ तासात आरोपी गजाआड

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : सुकवद (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी (ता. ५) पहाटे अनोळखी २८ वर्षीय तरूण महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू्ची नोंद करण्यात आली होती. जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व शिंदखेडा पोलिसांना तपासाचे चक्र फिरवीत सबंधीत प्रियकराला (दिडोंली- सुरत, गुजरात) येथून अटक करण्यात येवून शनिवारी (ता.९) शिंदखेडा न्यायालयाने सोमवार (ता.११) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुंधवत व शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनील भाबड यांनी मृत तरूण महिलेचा अंगावरील टॅटू व हातावरील नावावरुन तपासाचे चक्र फिरवीत ४८ तासात ओळख पटवून आरोपीला दिडोंली गुजरात येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मृत तरूणी विधवेचा भाऊ यांने शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्यादीत म्हटले आहे की, गौरव अनिल पाटील (वय २२, व्यवसाय - खासगी नोकरी रा. रॉयल स्टार्क टाऊन- सी रामी पार्क, दिंडोली सुरत गुजरात) दोग महिन्यापूर्वी मेहुणे संदीप कैलास पाटील यांचा मृत्यू झाल्याने बहीण रुपाली ऊर्फ माया पाटील ही तिचा मुलगा जयेश व मुलगी साक्षी यांच्यासह घरी राहत होती. रुपाली ही सुरत येथील कनिष्ठा डायमंड या कंपनीत खासगी नोकरी करित होती. रुपाली हिचे मनोज पाटील (मुळ, रा तावखेडा प्र.बेटावद, ता.शिंदखेडा व हल्ली मुक्काम दिडोंली, सुरत गुजरात) यांच्याशी चार वर्षापासून प्रेम संबंध होते. त्यांच्या सोबत नेहमी जात येत असे. मनोजशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो संबंध तोडत नव्हता. जिवे ठार मारेल अशा धमक्या देत होता रुपाली हिस मनोज पाटील नंदुरबार येथे प्लॉट घेवून देणार असून वीस हजार रोख देणार आहे. त्यामुळे त्याच्या सोबत जाते असे सांगितले. ६ ऑक्टोबरला दिडोंली सुरत पोलिस ठाण्यात रूपाली हरवल्या बाबत तक्रार देण्यात आली. रुपाली पाटील हीचा शिंदखेडा पोलिस ठाणे हद्दीत मृतदेह सापडला आहे. रुपाली हिचा मृत्यूदेह शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन रूम मध्ये शव पेटीत ओळख पटविण्यासाठी राखून ठेवला होता. रुपाली हिचे ओळख व खात्री झाली. मनोज पाटील यांने रुपाली हिस नंदुरबार येथे प्लॉट घेण्याचे आमिष दाखवून रुपाली ऊर्फ माया संदीप पाटील हिला जिवे ठार मारले आहे. याबाबत मनोज पाटील यांच्या विरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी त्याला शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनील भाबड यांनी हजर केले आसता न्यायाधीश संतोष वैद्य यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT