‘राष्ट्रवादी’चे दोन गट भिडले
‘राष्ट्रवादी’चे दोन गट भिडले sakal
जळगाव

धुळ्यात आमदार पवारांसमोर ‘राष्ट्रवादी’चे दोन गट भिडले

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कर्जत- जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा शुक्रवारी (ता. २२) येथे धावता दौरा होता. शहरात दुपारी साडेपाचनंतर त्यांचे आगमन झाल्यावर पारोळा रोड परिसरात स्वपक्षीय दोन गटांमधील वाद, झटापटीमुळे या दौऱ्याला गालबोट लागले. पक्षाचे येथील प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा स्वागतपर बॅनरवर फोटो नसल्याने गोटे समर्थक व अन्य गटात झटापट झाली. समोरच पक्षीय दोन गट भिडत असल्याने तिसरा गट आमदार पवार यांना थेट बुलेटवर घेऊन निसटला.

आमदार पवार हे जळगाव व धुळे अशा दोनदिवसीय धावत्या दौऱ्यावर होते. त्यांचे सायंकाळी साडेपाचला येथे पारोळा रोडवर आगमन झाले. त्याचे जंगी स्वागतही झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, प्रकाश थिएटर चौकात बॅनरवर प्रदेश उपाध्यक्ष गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक प्रशांत भदाणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात वाद सुरू झाला. आमदार पवार यांच्या समोरच भदाणे व कुणाल पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

काही कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सुरक्षितपणे आमदार पवार कारमध्ये बसण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पक्षाचा तिसरा गट आमदार पवार यांना थेट बुलेटवर घेऊन निसटला. तरीही झटापट सुरूच होती. कार्यकर्त्यांमधील राड्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. दरम्यान, चौकातील बॅनर स्वखर्चाने, वैयक्तिकपणे लावला. पक्षाच्या फादर बॉडीने तो लावलेला नव्हता, असा युक्तिवाद कुणाल पवार यांच्याकडून झाल्याचे सांगितले गेले.

तिसऱ्या गटाने पवारांना बुलेटवर नेले

पारोळा रोडवर राष्ट्रवादीचे दोन गट झटापट करत असताना तिसऱ्या गटाने ही संधी साधत, खूप आग्रह करत आमदार पवार यांना थेट बुलेटवर बसविले व साक्री रोडवरील भीमनगरकडे नेले. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादनानंतर कार्यकर्ते आमदार पवार यांना देवपूरमध्ये श्री एकवीरादेवी मंदिरात आरतीसह दर्शनासाठी घेऊन गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT