राष्ट्रवादीचे ‘जवाब दो’ आंदोलन sakal
जळगाव

धुळे : राष्ट्रवादीचे ‘जवाब दो’ आंदोलन

खड्डे, रस्तेप्रश्‍नी सार्वजनिक बांधकाम विभागातच ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील नादुरुस्त रस्त्यांसाठी शासनाने स्वर्णजयंती योजनेंतर्गत शंभर कोटींचा निधी मंजूर केला. पैकी बहुतेक निधी शासनाने वितरितही केला; परंतु रस्त्यांचे काम पूर्ण केले जात नाही. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (ता. २५) येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिकेविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन केले. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात समाधानकारक खुलाशासाठी ठिय्या मांडला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी रस्ते व निधीप्रश्‍नी लेखी आश्‍वासन मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या दालनात ठिय्या मांडला. यानंतर विभागाने संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या १० नोव्हेंबरनंतर कामाला सुरवात करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री. भोसले यांच्या मागणीवरून धुळे शहरातील शंभर कोटींच्या निधीतील रस्त्यांबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली होती.

मनपा आयुक्त, अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सचिव, मंत्रालयीन अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये शहरातील रस्त्यांचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश मंत्री भरणे यांनी दिला होता; परंतु दोन महिने उलटूनही मनपा व बांधकाम विभाग, ठेकेदारांनी काम पूर्ण केले नाही.

या सर्व कथित, चुकीच्या, अनियमित कामांमध्ये मनपा व बांधकाम, ठेकेदार यांचे संगनमत आहे, असा आरोप करत शहरातील रस्त्यांचे काय झाले, ठेकेदारांना नोटीस दिली का, मंत्र्यांच्या आदेशानंतर पुढे काय झाले, काम का थांबले आदी प्रश्‍नांवर श्री. भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलकांच्या शिष्टमंडळाने बांधकाम विभाग व मनपा अधिकाऱ्यांची भेट घेत खुलासा विचारला. त्यात दिरंगाई, वेळकाढूपणा, अनियमिततेबाबत ‘जवाब दो’ आंदोलन केल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT