disabled person esakal
जळगाव

Positive News : दिव्यांग रिक्षाचालक झाला बँक अधिकारी!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आयबीपीएस परीक्षांच्या माध्यमातून दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रकल्पाचे आठ विद्यार्थी बँक प्रोबेशनरी अधिकारीपदी, तर अन्य पाच विद्यार्थ्यांची सैन्य, पोलिस आणि भारतीय रेल्वेत निवड झाली आहे. (disabled rickshaw puller become bank officer jalgaon news)

यात बँक प्रोबेशनरी अधिकारीपदी प्रशांत केदारे, नांजा पावरा, सचिन कोलकर, दीपक गजरे, अमोल आव्हाड, हिना मुजावर, वैष्णव गिते, महादेव सागर यांची निवड झाली आहे, तर नेहरू झारखंडे याची सैन्यात, सुरेखा अवथळे पोलिसपदी, तर साईनाथ शिंदे, विनायक मगदूम आणि भास्कर पांढरे याची भारतीय रेल्वेत निवड झाली आहे.

रिक्षाचालक बनला बँकेचा अधिकारी

सुरवातीच्या काळात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारा दिव्यांग प्रशांत केदारे गेल्या ५ वर्षांपासून मनोबल प्रकल्पात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे आईवडिल भाजीपाला विक्री करतात.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

प्रज्ञाचक्षू नांजा पावरा मध्य प्रदेशातील निवाली गावाचा रहिवासी असून, त्याचे आईवडिल शेतमजुरी करतात. अमरावती जिल्ह्यातील बामादेही गावातील दिव्यांग नेहरू झारखंडे सहा वर्षांपासून प्रकल्पात होता. त्याचे आईवडिल हातमजुरी करतात.

प्रज्ञाचक्षू, दिव्यांग व वंचित विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी व भविष्यासाठी अत्यंत दिशादर्शक आहे, अशी प्रतिक्रिया यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Likely Squad For AUS Tour : सूर्यकुमार यादव IN, रोहित, विराटची एन्ट्री; जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांना विश्रांती

D-Mart Income: बापरे! डीमार्टची 'ही' फक्त तीन महिन्यांची कमाई… आकडा वाचून थक्क व्हाल

Diwali 2025: यंदा दिवाळी 20 कि 21 ऑक्टोबर? जाणून घ्या 5 दिवसांच्या दिपत्सोवसाची संपूर्ण यादी

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण आता नाही राहिलं, एकनाथ शिंदेंनी मोठा गळ टाकला; राजन तेलींचा शिवसेना प्रवेश

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

SCROLL FOR NEXT