dispute Jamner for arresting molestation suspect Jalgaon Crime News
dispute Jamner for arresting molestation suspect Jalgaon Crime News  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयितास ताब्यात घेण्यावरून जामनेरला राडा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : विवाहितेचा विनयभंग केलेल्या संशयितास तिच्या नातेवाईकांनी जाब विचारला असता संबंधित तरुणाने शिवीगाळ व मारहाण केली.

ही घटना गुरुवारी (ता. ४) सकाळी घडली. जामनेर पोलिसांनी गारखेडा येथून संशयितास अटक केली. (dispute Jamner for arresting molestation suspect Jalgaon Crime News)

या पीडितेसह नातेवाईकांनी जामनेर पोलिस ठाण्यासमोर संशयितांना आमच्या ताब्यात द्या, यासाठी धुडगूस घालत ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त नातेवाईकांकडून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

फिर्यादी महिला तीन महिलांसोबत संशयित केशव माधव शिंदे (रा. गारखेडे खुर्द, ता. जामनेर) यांच्या शेतात कामावर गेली होती. संशयित शिंदे याने फिर्यादी महिलेसोबत लज्जास्पद कृत्य केले. याबाबत महिलेने पती, सासू व सासऱ्यांना सांगितले.

महिलेचे नातेवाईक गुरुवारी सकाळी संशयिताच्या घरी गेले असता संशयित आशिष श्रीराम शिंदे (रा. गारखेडे, ता.जामनेर) याने शिवीगाळ व मारहाण करून धमकी दिल्याची व केशव शिदे याने विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.

या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण शिंदे तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT