fighting  esakal
जळगाव

महिलांच्या छेडखानीसाठी शिट्ट्या वाजवल्याने धुमश्‍चक्री

याबाबत नशिराबाद पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नशिराबाद बसस्थानकाजवळ महिला, तरुणींना पाहून शिट्या का वाजतात, असा जाब विचारल्यावरून तरुणासह त्याच्या भावाला चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व दगडफेक करून दुखापत केली. याबाबत नशिराबाद पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फजलखान फरीद खान (वय १८, रा. अली मोहल्ला, नशिराबाद) पेंटरकाम करून उदरनिर्वाह करतो. मंगळवारी (ता. १४) दुपारी फजल खान त्याचा चुलतभाऊ दानिश खान, रईस खान याच्यासोबत घरी पायी जात असताना, बसस्थानकाजवळ रूपेश माळी, वासू माळी, विनोद माळी, गणेश माळी (सर्व रा. नशिराबाद) मुली व महिलांकडे पाहून शिट्या मारत होते. त्यावर महिलांना पाहून शिट्या का मारताय, असा जाब फजलखान याने विचारला. याचा राग असल्याने चौघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर दगडफेक केली. यात फजल खानचा चुलत भाऊ दानिश खान याचे डोके फुटले व दोघांना ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT