Sanjay Suresh Tribhuvan esakal
जळगाव

Jalgaon Sand News : भडगावचा वाळूमाफिया वर्षभरासाठी स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Sand News : भडगाव (जि.जळगाव) येथील संशयित अट्टल गुन्हेगार आणि वाळूमाफियाला आज जिल्‍हा प्रशासनाने एक वर्षासाठी स्थानबद्ध करून नागपूर कारागृहात रवाना केले.

भडगाव तालुक्यातील वाळूमाफीया संजय सुरेश त्रिभुवन (वय २६ रा. वाक ता. भडगाव) याच्याविरुद्ध जबरी लूट, सरकारी नोकरांवरील हल्यासह एकूण सहा गंभीर गुन्हे, तीन प्रतिबंधात्मक कारवाई यापूर्वी झाली आहे.(district administration sent accuse Nagpur jail for one year jalgaon sand news)

त्रिभुवन याच्यावर एमपीडीएची कारवाई झाल्याने भडगाव-पाचोरा-चाळीसगाव तालुक्यातील गौणखनीज माफियांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी (ता. २) सायंकाळी पाचला दिले. त्यानुसार ‘रेकॉर्ड'वरील संशयित गुन्हेगाराला ताब्यात घेत रविवारी (ता. ३ ) सकाळी भडगाव पोलीस कर्मचारी नागपूर येथे रवाना झाले. संजय त्रिभुवन असे त्याचे नाव आहे.

तक्रारींच्या आधारे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही संजय नियंत्रणात येत नसल्याने भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात संजय त्रिभुवनची गुन्हेगारी कुंडली चाळीसगाव उपविभागीय कार्यालयात आणि तेथून जिल्‍हा पोलीस अधीक्षक कार्यालयास रवाना करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक कार्यालयास प्रस्ताव प्राप्त होताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला प्रस्ताव देण्यात आला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक उपनिरीक्षक युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांच्या पथकाने गुन्ह्याचा आराखडा आणि स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून जिल्‍हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना सादर केला.

हा प्रस्ताव जिल्‍हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता. भडगावचे निरीक्षक पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक शेखर डोमाळे, प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे, जितू राजपुत यांच्या पथकाने त्रिभुवनला ताब्यात घेत जळगावला आणले. जिल्‍हाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यावर त्याला अटक करून पथक नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना झाले.

भडगाव पोलिस ठाणेंतर्गत गौणखनीज माफियांची हिंमत गेल्या काही दिवसांत वाढली आहे. पत्रकारावर ट्रॅक्टर घालून त्याला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करून महसूल प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर तत्कालीन जिल्‍हाधिकाऱ्यांनी आदेशीत केल्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र या गंभीर गुन्ह्याला नंतर ‘क्रॉस कंम्पलेंट'चा उतारा देत गांभीर्य कमी करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT