BJP  esakal
जळगाव

Jalgaon News : भाजपला बड्या नेत्यांच्या सभांच हवे ‘कन्फर्मेशन’; मोदी, योगी, गडकरी, स्मृती इराणींच्या सभांचे नियोजन

Jalgaon News : जिल्ह्यातील दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांमधून भाजप-महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता पक्षाला बड्या नेत्यांच्या सभांचे कन्फर्मेशन हवे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांमधून भाजप-महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी (ता. २५) अर्ज दाखल केल्यानंतर आता पक्षाला बड्या नेत्यांच्या सभांचे कन्फर्मेशन हवे आहे. जिल्हा भाजपने त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांच्या सभांची मागणी केली आहे. (District BJP wants Confirmation for meetings of leaders)

प्रत्यक्षात अद्याप कुठल्याही सभेची तारीख निश्‍चित झालेली नाही. जळगाव व रावेर यासह खानदेशातील चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. धुळे, नंदुरबारला पाचव्या टप्प्यात २० मेस, तर जळगाव व रावेर मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील म्हणजेच १३ मेस मतदान होणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह बड्या नेत्यांच्या सभांसाठी तारखा मागविल्या आहेत.

मोदी, योगी येण्याची शक्यता

जिल्हा भाजपच्या सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांच्या सभांसाठी तारखा मागविण्यात आल्या आहेत. यापैकी काही नेत्यांच्या सभा निश्‍चित होणार आहेत.

श्री. मोदी यांच्या सभेसाठी जिल्हा भाजप आग्रही असून, त्यांना योगींची सभाही हवी आहे. अद्याप यापैकी कोणत्याही नेत्याच्या सभेची तारीख मिळालेली नाही. तरी साधारणत: ६ किंवा ७ तारखेस नरेंद्र मोदींची जळगाव जिल्ह्यात सभा होऊ शकते. (Latest Marathi News)

मोदींची सभा कुठे होणार?

रावेर व जळगाव अशा दोन्ही मतदारसंघांमधून मोदींच्या सभेसाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे नेमकी सभा कुठे घ्यायची, हा प्रश्‍न जिल्हा भाजपसमोर आहे. २०१४च् या निवडणुकीला या दोन्ही मतदारसंघांसाठी उपयुक्त होईल, अशाठिकाणी जळगाव-भुसावळ महामार्गावर दूरदर्शन टॉवरलगतच्या मैदानावर मोदींची अभूतपूर्व सभा झाली होती. २०१९च्या दरम्यान सागर पार्कवर सभा झाली. आता सभा कुठे घ्यायची, हा प्रश्‍न कायम आहे.

तापमानामुळे सभांना मर्यादा

दरवेळेप्रमाणे या सार्वत्रिक निवडणुकीतही मतदानाचे टप्पे भर उन्हाळ्यात, कडाक्याच्या तापमानात एप्रिल- मे महिन्यात आलेय. त्यातही खानदेश, विदर्भातील तापमान देशात उच्चांकी असते. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांच्या जळगावातील भाजप उमेदवार अर्ज दाखल करतानाच्या शक्तिप्रदर्शन सभेत तापमानाच्या चढत्या पाऱ्याचा फटका बसल्याचे दिसून आले.

आता तापमान आणखी वाढणार आहे. वैशाख वणवा पेटलेला असताना, जाहीर सभांना गर्दी होणार का? हा प्रश्‍न असल्याने जाहीर सभा घेण्यापेक्षा व्यक्तिगत गाव दौरे, मतदार भेटींवर फोकस करायचा, असे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT