Jalgaon District Bank esakal
जळगाव

District Bank Election : अध्यक्ष, उपाध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात? राजकीय डावपेचाचा लागणार कस..

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (District Central Cooperative Bank) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची शनिवारी (ता. ११) निवड होणार आहे. ‘राष्ट्रवादी’तर्फे अध्यक्षपदाची, तर शिवसेना शिंदे गटातर्फे उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता असली,

तरी नावाबाबत एकमत न झाल्यास संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक होण्याची शक्यताही आहे. (District Central Cooperative Bank President and Vice President will be elected on 11 march jalgaon news)

महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गटाच्या संचालकांची शनिवारी सकाळी स्वतंत्र बैठका होणार आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हा बँकेच्या संचालकांची सभागृहात सकाळी अकराला विशेष बैठक होईल. पीठासीन अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक (सहकार) संतोष बिडवई असतील. बैठकीत उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, तसेच आवश्‍यक असल्यास निवडणूक घेण्याची प्रक्रिया होईल.

अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

जिल्हा बँकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकाचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, प्रदीप देशमुख व डॉ. सतीश पाटील यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी नऊला जळगावमधील मुक्ताईनगर निवासस्थानी महाविकास आघाडीच्या संचालकांची बैठक होणार आहे. तीत अध्यक्षपदाचा उमेदवार निश्‍चित करण्यात येणार आहे.

शिवसेना शिंदे गटाची बैठक

शिवसेना शिंदे गटाला उपाध्यक्षपद मिळण्याचे निश्‍चित आहे. त्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालकाची बैठक सकाळी शासकीय विश्रामगृहावर होणार आहे. तीत उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित करण्यात येईल. या पदासाठी पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

राजकीय डावपेचही होण्याची शक्यता

महाविकास आघाडीतर्फे अध्यक्ष व शिवसेना शिंदे गटातर्फे उपाध्यक्षापदाच्या नावाची निश्‍चिती होणार आहे. मात्र, त्यांच्या बैठकीत नावावर एकमत न झाल्यास निवडणूक होऊन राजकीय डावपेच होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत भाजपचे आमदार संजय सावकारे एकमेव संचालक आहेत.

त्यामुळे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याची शक्यता नाकारली आहे, तर शिवसेना शिंदे गटाने उपाध्यक्षपद घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, राज्य व केंद्रात सत्ता असलेल्या भाजप व शिवसेना शिंदे गटाला जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळविण्याबाबत विचार आल्यास ते राजकीय डावपेच खेळू शकतात.

त्यामुळे निवडणूकही होण्याची शक्यता आहे. ते झाल्यास अनेक उलटफेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे निवडीनंतरच समजेल. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT