esakal
esakal
जळगाव

Jalgaon News: मंगल कार्यालयात बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे फलक लावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. (district collector instruction Put up Child Marriage Prevention Act placard in Mangal office jalgaon news)

यानुसार बालविवाह, हुंडा देणे-घेणे यात सहभागी नागरिक, माता-पिता, पालक, प्रिंटिंग प्रेस, पुरोहित (सर्वधर्मीय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, केटरर्स, व्यवस्थापक मंगल कार्यालय तसेच संबंधित व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

बालविवाहमुक्त जळगाव जिल्हा होण्यासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मंगल कार्यालय व विविध धार्मिकस्थळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय विवाह करता येणार नाही.

शालेय पुरावा घेतल्याशिवाय मंगल कार्यालय किंवा मंदिरामध्ये कोणतीही लग्नाची नोंदणी होणार नाही व बालविवाह घडून येणार नाहीत, याबाबत कटाक्षाने पालन व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मंगल कार्यालय व धार्मिकस्थळी विवाह करताना मुला-मुलींच्या वयाची पडताळणी शालेय कागदपत्र पाहूनच करावी.

शिवाय मंगल कार्यालयाच्या धार्मिकस्थळांच्या दर्शनी भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६’ व ‘हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१’चे माहिती फलक, मॅटेलिक बोर्ड, वॉल पेंटिंग हे कायमस्रूपी दर्शनी भागावर लावणे जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार बंधनकारक आहे. असे घडत नसल्यास संबंधित पोलिस ठाणे, महिला हेल्पलाईन क्रमांक १०९१ व १८१ वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

दोन वर्षांची शिक्षा

बालविवाह लावल्यास, बालविवाहास चालना किंवा परवानगी देणाऱ्यास शिक्षा आहे. बालविवाहास चालना देणारी कृती किंवा तो विधीपूर्वक लावण्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जी करतील, यामध्ये बालविवाहास उपस्थित राहणारी किंवा त्यात सहभागी होणारी व्यक्ती यांचाही समावेश होतो. अशी व्यक्तला दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक लाख रुपयापर्यंत दंड असू शकेल. इतक्या द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT