Officials with Collector Ayush Prasad while inspecting the preparations for Sahitya Samela. esakal
जळगाव

Amalner Marathi Sahitya Sammelan : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला साहित्य संमेलन तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Amalner Marathi Sahitya Sammelan : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या तयारीत कोणतीही कमतरता राहणार नाही.

याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना‌ त्यांनी सूचना दिल्या. अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलन तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रताप महाविद्यालयात बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. खानदेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक नीरज अग्रवाल, मराठी वाड्मय मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश‌ जोशी, अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर.

तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक विकास देवरे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

साहित्य संमेलन स्थळावर राज्यसभा सदस्य व्ही. मूरलीधरन‌ यांच्या खासदार निधीतून सुरू असलेल्या स्वच्छतागृह बांधकाम प्रगतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सध्या हे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

चारही दिशांना रस्ते

खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून साहित्य संमेलन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानात संमेलनस्थळाकडे जाणाऱ्या चारही दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, कॉक्रीटीकरण पूर्ण झाली असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

महावितरणच्या कामांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. स्वच्छता, पाणीपुरवठा, पोलिस बंदोबस्त, वाहतूक आराखडा, व्हीआयपी पाहुण्यांसाठी साहित्य संमेलन स्थळी पोहचण्याचा पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था.

हेलिपॅड व्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. प्रत्येकाला नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलन मंडप, संमेलन स्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची,‌ पर्यायी मार्ग व हेलिपॅडच्या कामांची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT