District Magistrates Guidelines announced for marchers jalgaon news  esakal
जळगाव

Jalgaon News : 'या' आहेत मोर्चेकऱ्यांसाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयात दररोज विविध व्यक्ती, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, मोर्चा काढून निवेदन देण्यास येत असतात. (District Magistrates Guidelines announced for marchers jalgaon news)

तथापि, निवेदन देण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यालयात येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांनी एक परिपत्रक काढले असून, त्याद्वारे निवेदन देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

या अनुषंगाने संबंधित सर्व पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना सूचना निर्गमित केल्या आहेत, त्या अशा : विविध व्यक्ती, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, समूह यांनी निवेदन देण्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात परवानगी मागण्याचा अर्ज दिल्यानंतर संबंधित पोलिस निरीक्षकांनी ज्या विभागास, कार्यालयास निवेदन देण्यात येणार आहे,

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

त्या विभागाचे, कार्यालयप्रमुखांना किमान एक दिवस आधी कळविणे आवश्यक आहे. निवेदन देताना मोर्चात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन त्या विभागात, कार्यालयात पुरेसा पोलिस बंदोबस्त पुरविण्याची दक्षता घ्यावी, मोर्चामधील केवळ ५ व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहील.

...तर गुन्हा दाखल होणार

मोर्चा काढून निवेदन देताना शासकीय कार्यालयात शांतता ठेवणे आवश्यक राहील. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, कार्यालयात उपस्थित नागरिकांना घोषणाबाजीमुळे त्रास होणार नाही, याबाबत संबंधितांना पूर्व सूचना देण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT