ST News esakal
जळगाव

Diwali MSRTC Fare Hike : दिवाळीत STला भाडेवाढीचा चटका!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महामंडळाची लालपरी अतिरिक्‍त फेऱ्या मारणार आहे. मात्र याच दिवाळीच्‍या गर्दीच्‍या हंगामात एसटीची भाडेवाढ केली आहे. यामुळे यंदा लालपरीतून दिवाळीच्‍या प्रवासाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १० टक्के नैसर्गिक भाडेवाढ गुरुवार (ता. २०)पासून लागू झाली आहे. (Diwali MSRTC Fare Hike Fare Hike to ST on Diwali 2022 Jalgaon Latest News)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक जळगावला येत असतात. यामुळे रेल्‍वेच्‍या कित्येक गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. शिवाय, खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून जादा भाडे आकारण्यात येत आहे. यामुळे काही नागरिकांनी महामंडळाच्या बसला पसंती दिली. मात्र आता महामंडळाच्या बसचेदेखील दर वाढल्याने नागरिक चिंतित झाले आहेत. २० ते ३० ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे.

५ ते ६५ रुपयांनी भाडेवाढ

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे जादा बस सोडण्यात येणार आहेत. मात्र महामंडळाने १० टक्के भाडेवाढ केल्‍याने प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. यात प्रामुख्‍याने जळगावहून पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना ६०५ ऐवजी ६६५ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईसाठी ६३५ रुपयांवरून ७०० रुपये इतके भाडे झाले आहे. एकंदरीत महामंडळाने ५ ते ६५ रुपयांपर्यंत भाडेवाढ केली आहे.

पुणे मार्गावर रोज वीस बस

सुटीच्‍या कालावधीत पुणे येथून येणाऱ्यांची संख्‍या अधिक आहे. यामुळे या मार्गावर जळगाव विभागातून रोज २० बसचे नियोजन आखले आहे. यात जळगाव येथून सुटण्याची वेळ शिवशाही सकाळी ७.३०, ८.३०, रात्री ८.३०, सायंकाळी ५.३०, परिवर्तन सकाळी ५, रात्री ७.३०. तर शयनयान आसनी रात्री ९ ला जादा गाडी सोडण्यात येणार आहे. तसेच पुण्याहून शिवशाही सकाळी ७, ८, सायंकाळी ५.३०, परिवर्तन रात्री ८, रात्री ९.३०, शयनयान आसनी रात्री ९ याप्रमाणे दिवाळीनिमित्ताने बस वाढविण्यात आल्या आहेत

"दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी पाहता जादा बसचे नियोजन केले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गांवर १८ जादा बस सोडल्‍या आहेत. शिवाय भाऊबीजेनंतरदेखील जादा बसचे नियोजन असून, यासाठीचे आरक्षण महामंडळाच्‍या वेबसाइटवर ओपन केले आहे."

-भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT