Farmers Diwali in Darkness esakal
जळगाव

Diwali Update : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच ; अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर पडायला विलंब

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : सप्टेंबर २०१९ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळवण्यासाठी तीन वर्षे शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला. मात्र शासन निर्णयाच्या आडकाठीमुळे तहसीलदार शेतकऱ्यांना मदत देण्यास नकार देत असल्याने काही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अमळनेर तालुक्यात जुलै २०१९ मध्ये २० गावांना अतिवृष्टी झाली होती. त्यात ५ गावांचा अवकाळी म्हणून पंचनामा करून त्यांना हेक्टरी ८ हजार प्रमाणे २ हेक्टरपर्यंत मदत करण्यात आली. तर ऑगस्ट महिन्यात शासनाने काढलेल्या निर्णयानुसार १५ गावांना पीक कर्जदार शेतकऱ्यांना पणन व सहकार खात्यांमार्फत शेतकऱ्यांवर ज्या बँकेचे कर्ज होते त्यांना ऑगस्टपर्यंत व्याजासह १ हेक्टर मर्यादेपर्यंत कर्ज माफ केले होते.(Diwali Update Diwali of farmers in darkness Delay in release of heavy rainfall subsidy to account Jalgaon News)

त्यात स्पष्ट उल्लेख होता की राष्ट्रीय किंवा राज्य आपत्ती विभागातर्फे कोणतीही मदत दिली जाणार नाही. त्यांनतर सप्टेंबर २०१९ मध्ये पुन्हा अमळनेर तालुक्यात ४० गावात अतिवृष्टी झाली. १३ हजार हेक्टर क्षेत्राचे सुमारे १७ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकरी, लोकप्रतिनिधी, आमदार अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार शरद पवार यांच्यासह अनेकांनी पाठपुरावा केला.

सरकार बदलल्यानंतर तीन वर्षांनी अमळनेर तालुक्यासाठी त्या ४० गावांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३५ कोटींची मदत मंजूर झाली. मात्र महसूल विभागाकडून फक्त बिगर कर्जदार व थकबाकीदार शेतकऱ्यांना १ हेक्टर मर्यादा ग्राह्य धरून २० हजार ४०० रुपये मदत देण्यात येत आहे. वास्तविक सप्टेंबर २०१९ मध्ये शासनाने पुन्हा नवीन निर्णय काढून अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय किंवा राज्य आपत्ती विभागाकडून मदत दिली जाईल, असा उल्लेख असताना मात्र त्यांना दोन्ही निर्णयाचा संभ्रम निर्माण करून कर्जदार शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही.

त्यामुळे सुमारे १५ ते १६ हजार शेतकरी मदतीपासून वंचित राहतील. त्यांची दिवाळी अंधारात जाईल. सरासरी २७ हजार रुपये प्रमाणे मदत शेतकऱ्यांना करता येईल. तरी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

"सप्टेंबर २०१९ मध्ये कोणालाच कर्जमाफी झालेली नाही आणि आता आलेली मदतही मिळत नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये याची शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन होईल."

- प्रा सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष, किसान काँग्रेस, अमळनेर

"कर्जमाफी मिळाली नाही, याचे प्रमाणपत्र घेतले आहे. रक्कम दिली गेल्यास ऑडिट आणि रिकव्हरीला खूप अडचणी येतात म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल."

- मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT