QR Code sakal
जळगाव

‘तो’ क्यूआर कोड स्कॅन करू नका

सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोविड टेस्ट किंवा वैद्यकीय चाचण्यांसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम देत असल्याचे सांगत यूपीआय क्यूआर कोड पाठवला जातो. तो यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करू नये, असे व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. अन्यथा आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी नागरिकांना दिला आहे.

सध्या सायबर गुन्हेगार शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिकांना फोन करून ते भारतीय सैन्य दलातील अधिकारी, कर्मचारी आहेत, असे भासवून त्यांच्या येथील अधिकारी, कर्मचारी यांचे कोविड टेस्ट किंवा वैद्यकीय चाचण्या करावयाच्या आहेत, असे सांगून त्यासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम देत असल्याचे, पैसे पाठवत असल्याचे सांगत यूपीआय क्यूआर कोड पाठवला जातो व तो यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. संबंधित नागरिक पैसे येणार म्हणून सायबर गुन्हेगारांनी पाठवलेला यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करतात व आपला यूपीआय पीन टाकतात, त्यानंतर मात्र आपल्या खात्यातील पैसे कपात होतात.

अशाप्रकारे आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे याबाबत सर्व नागरिकांनी असे व्यवहार करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिस ठाणे व जिल्हा पोलिस दलाने केले आहे. सायबर अपराध झाल्यास तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, https://cvbercrime.gov.in/ या पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहनही पोलिस निरीक्षक गोराडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

SCROLL FOR NEXT