जळगाव

जळगाव : प्रोटोकॉल पाळला नसल्याने आमदार भोळेंकडून निषेध

जळगाव येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या पोलीसांच्या अत्याधुनिक वसाहतीचे उद्‌घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या पोलीसांच्या अत्याधुनिक वसाहतीचे उद्‌घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

जळगाव : शासकीय कार्यक्रम असल्यास स्थानिक आमदारांना पाचारण करावे असा शासकीय अध्यादेश आहे, मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील(home minister dilip valse-patil) यांनी जळगाव (jalgaon) येथील पोलिस वसाहतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात त्या आदेशाला बासनात गुंडाळ्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे(bjp mla suresh bhole) यांनी निषेध केला व मंत्र्यासोबत व्यासपीठावर बसण्यास नकार दिला.

जळगाव येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या पोलीसांच्या अत्याधुनिक वसाहतीचे उद्‌घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच स्थानिक भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांना पाचारण करण्यात आले होते. उद्‌घाटनानंतर व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर होते, मात्र आमदार भोळे हे खाली बसले होते. त्यावेळी त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह करण्यात आला मात्र त्यांनी नकार दिला, मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आग्रहाने त्यांना व्यासपीठावर येण्याचा आग्रह केला त्यानंतर आमदार भोळे व्यासपीठावर विराजमान झाले.

याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की जळगावात पोलीसांसाठी अत्याधुनिक घरे असावीत यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा केला, त्या माध्यमातून निधीही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्याला आज कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. आपण त्यानुसार कार्यक्रमासाठी गेलो, राज्याचे गृहमंत्री जळगावात आले म्हणून स्थानिक आमदार म्हणून आपण त्यांचा गुलाबपुष्प देवून सत्कार केला, मात्र प्रोटोकॉल म्हणून पालकमंत्र्यांनी उद्‌घाटन कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक आमदार म्हणून आपल्याला बोलावयास हवे होते, मात्र त्यांनी उद्‌घाटन करताना आपल्याला बोलाविले नाही, तसेच त्या ठिकाणी वृक्षारोपण करतानाही त्यांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही, त्यामुळे आपण त्याचा निषेध म्हणून व्यासपीठावर गेलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT