Hatnur Dam esakal
जळगाव

‘हतनूर’चे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना इशारा

जिल्ह्यात कुठेही पाऊस नसताना हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाण्याची आवक वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वरणगाव (जि. जळगाव) : विदर्भात नुकताच मान्सूनने प्रवेश केला असून मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने विदर्भ व मध्यप्रदेशातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. यंदा पाहिल्यांदा विसर्ग करण्यात येत असून मुख्य अभियंता एस. जी. चौधरी यांनी धरणाचे पूजन केले.

विदर्भ आणि मध्य प्रदेशात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता. १६) झालेल्या पावसाची नोंद ३९३ मिलीमीटर करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही पाऊस नसताना हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची वाढ झाली असून सद्यःस्थितीत ३ हजार ९५५ क्युसेस पाणी तापी नदीपात्रात सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील २६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणीही आपले गुरेढोरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडू नयेत, असे आवाहन हतनूर धरणाचे अभियंता एस. जी. चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

Latest Marathi News Live Update : जळगाव शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार : पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज !

कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

SCROLL FOR NEXT