jalgaon muncipal corporation sakal
जळगाव

गटारीत उतरून सफाईच्या चौकशीचे आदेश

आयुक्तांकडून दखल; आरोग्याधिकाऱ्यांकडून मागविली माहिती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - चोकअप साफ करण्यासाठी सफाई कामगाराला थेट गटारात उतरविल्याचा प्रकार ‘सकाळ’ने बुधवारी बातमीच्या रूपातून समोर आणल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. आयुक्त विद्या गायकवाड यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत आरोग्याधिकारी व आरोग्य निरीक्षकाकडून त्यासंबंधी चौकशी करून माहिती मागविली आहे.

सेप्टिक टँक, मैला अथवा गटार साफ करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून केंद्र सरकारने कठोर कायदे केले आहेत. या ठिकाणांची स्वच्छता यंत्राद्वारे करणे बंधनकारक असताना, अनेक ठिकाणी सफाई कामगारांना त्यात उतरवून स्वच्छता केली जात असल्याचे प्रकार समोर येत असतात. असाच प्रकार जळगावातील बळीरामपेठेत नुकताच घडला. गटाराचे चेंबर चोकअप झाल्यानंतर त्याठिकाणी कामगाराला उतरवून ते साफ करण्यात आले. त्याबाबत ‘सकाळ’ने बुधवार (ता. १)च्या अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

आयुक्तांकडून दखल

या वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांनी सकाळीच संबंधित भागातील आरोग्य निरीक्षकाला याबाबत जाब विचारला, तसेच आरोग्याधिकाऱ्यांनाही प्रकरणाची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मनाई करूनही कामगारांची ‘ना’

गटारीत उतरवून स्वच्छता करण्याबाबत अनेकदा सफाई कामगारांना मनाई केली जाते. हातात ग्लोव्हज, पायात बूट व किट घालून सफाई करण्यासंबंधी सूचना केली जाते. मात्र, कामगार हे साहित्य घालून स्वच्छता करण्याचे टाळतात, असाही अनुभव आहे.

गटारीत उतरवून स्वच्छता करण्याच्या प्रकाराचे वृत्त वाचले. यासंबंधी आरोग्य निरीक्षकाकडून माहिती घेण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व सरकारच्या परिपत्रकाचा अभ्यास करण्यात येत असून, यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल.

- विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT