dr satish patil
dr satish patil esakal
जळगाव

Market Committee Election : न्यायालयाची लढाई जिंकलो, रणांगणही जिंकू : डॉ. सतीश पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विरोधकांनी आपला अर्ज अवैध ठरवून महाविकास आघाडीला छेद देण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्याचा नेहमी विजय असतो. उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २१) आपला अर्ज वैद्य ठरवून निकाल दिला. (dr Satish Patil statement about market committee election win jalgaon news)

न्यायालयाची लढाई आपण जिंकलो, आता बाजार समितीचे निवडणूक रणांगणही जिंकू, शेतकऱ्यांचे हित सोडून स्वतःचे हित जोपासणाऱ्या विरोधकांना जागा दाखल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केला.

बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्केट कमिटी बचाव पॅनलच्या प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते. सकाळी ग्रामदैवत बालाजी महाराज यांचे दर्शन घेत टेहू (ता. पारोळा) येथे प्रचार सभा घेण्यात आली.

या वेळी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, आमदार अनिल पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, जिल्हाप्रमुख शिवसेना विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक रोहन मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, व्यापार व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोराज पाटील, माजी प्र. सदस्य हिंमत पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, जिल्हा बँक संचालक पराग मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुवर्णा पाटील, तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, माजी सभापती रेखा पाटील, संध्याताई मोरे, बबीता पाटील, डॉ. शांताराम पाटील यांच्यासह पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत बाजार समिती सुरू असलेल्या एक कलमी कार्यक्रमाचा समाचार घेत भ्रष्ट कारभाराला आता लगाम देण्याची वेळ असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांचा समतोल राखा : अनिल पाटील

बाजार समिती ही शेतकऱ्यांची असून, मागील काळात टोकण व कट्टी हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून कारभार सुरू राहिला. मात्र बाजार समितीचा तालुक्याचा प्रादेशिक समतोल साधने गरजेचे असून, विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

गद्दारांना धडा शिकवा : संजय सावंत

ज्या पक्षाने मोठे केले, त्याच्याशी गद्दारी करून मिंधे सरकारशी हातमिळवणी करणाऱ्या गद्दारांना आता बाजार समिती निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.

बाजार समिती भ्रष्टाचारमुक्त करा : डॉ. हर्षल माने

गेल्या अनेक वर्षापासून एकहाती सत्तेमुळे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बाजार समितीत करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून ती थांबवण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी केले.

हित जोपासणे गरजेचे : ॲड. मोरे

बाजार समितीत हुकूमशाही सुरू असून, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असून ती जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांनी केले.

आमीष दाखविणाऱ्यांना धडा शिकवा

माजी मंत्री डॉ. पाटील म्हणाले, की बाजार समितीची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई असून, माझा अर्ज रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यात आले. लाखो रुपये खर्च करण्यात आले.

मात्र न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला असून, बाजार समितीची निवडणूक हारलो तर पुढचा राजकीय प्रवासाबाबत विचार करेल, असे सांगून फितूर व आमीष दाखविणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवण्याचे आवाहन केले. संतोष महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर योगेश रोकडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT