While giving information in the press conference, former Guardian Minister Dr. Satish Patil. Neighbors Taluka President Santosh Mahajan, Youth President Yogesh Rokade. esakal
जळगाव

Sharad Pawar Jalgaon : शेवटच्या श्र्वासापर्यंत शरद पवारांसोबतच : डॉ. सतीश पाटील

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar Jalgaon : आपल्या भूमिकेविषयी अफवा पसरविल्या जात असून, जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आपली भूमिका ठाम असून, शेवटच्या श्वासापर्यंत आपण खासदार शरद पवार यांच्यासोबत राहूनच काम करणार असल्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी स्पष्ट केले. येथील पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर टीका केली.()

पत्रकार परिषदेत डॉ. सतीश पाटील म्हणाले, की पंचायत समितीचा सभापती म्हणून राजकीय जीवनाची वाटचाल करताना वेळोवेळी मतदारसंघात प्रामाणिकपणे पक्षाची भूमिका मांडून कधीही आमिषाला बळी पडलो नाही. जीवनात अनेक प्रसंग आले.

मात्र निष्ठा व प्रामाणिकपणा ठेवून शरद पवार यांचा निष्ठावंत पाईक म्हणून आपण काम केले, काम करीत आहोत. येणाऱ्या काळात देखील पक्षाच्या माध्यमातून व जनतेच्या आशीर्वादाने निवडणुकीला सामोरे जाऊन विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचा दावा डॉ. पाटील यांनी केला आहे.

गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून समाजकारणातून राजकारण करताना (स्व.) आमदार भास्करराव पाटील यांची संस्काराची शिकवण सोबत घेत राजकीय गुरू म्हणून खासदार शरद पवार हे आपले आजवर मार्गदर्शक राहिले आहेत. पंचायत समितीचा सभापती ते आमदार, पालकमंत्री अशी पदांची जबाबदारी सांभाळताना कधीही भुलथापांचे राजकारण केले नाही.

बाजार समितीत बुधवारी झालेल्या शेतकरी मेळाव्याला न भूतो न भविष्य प्रतिसाद मिळाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली असून, त्यातूनच असे प्रकार घडत असून, विरोधकांच्या वल्गना निश्चितपणे जनता हाणून पाडेल, असा इशारा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला आहे. या वेळी तालुकाध्यक्ष संतोष महाजन, युवक तालुकाध्यक्ष योगेश रोकडे, शहराध्यक्ष जितेंद्र पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT