Scenes from the play 'Godo Once Again' performed at the State Drama Competition on Saturday. esakal
जळगाव

Rajya Natya Spardha 2023 : मानवी भावभावनांचा हुंदका ‘गोदो वन्स अगेन’

सकाळ वृत्तसेवा

Rajya Natya Spardha 2023 : सॅम्युअल बॅकेटने जागतिक रंगभूमीवर अजरामर केलेले नाटक म्हणजे ‘वेटिंग फॉर गोदो’ त्यात दुसऱ्या महायुद्धानंतरची अनिश्चितता व त्यामुळे माणसांमध्ये मानसिक व शारीरिक पातळीवर उठलेली आंदोलने आणि कुणीतरी यातून आपली सुटका करेल, असा आशय मांडण्यात आला होता. (Drama Godo Once Again is dowry of human emotions rajya natya spardha 2023 jalgaon news)

या नाटकाला समांतर परंतु त्याचा पुढील टप्पा असलेले नाटक म्हणजे ‘गोदो वन्स अगेन’ हे भगवान हिरेलिखित व पंकज सनेर दिग्दर्शित नाटक भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन, भुसावळ यांनी राज्य नाट्य स्पर्धेचे दुसरे पुष्प गुंफताना शनिवारी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर केले.

‘वेटिंग फॉर गोदो’ या नाटकात गोदोचे पात्र आभासी होते. ते रंगमंचावर कधी येतच नाही; पण तो रंगमंचावर यावा, या अपेक्षेत तो प्रयोग रंगायचा. ‘गोदो वन्स अगेन’मध्ये मात्र सुरवातीपासूनच गोदो रंगमंचावर असतो. गोदो कधी जादूगाराच्या, तर कधी आणखी कुणाच्या तरी रूपात येऊन दीदी व गोगो या दोन पात्रांचा मानसिक, शारीरिक छळ करतो.

त्यांनाही या अस्वस्थेपासून सुटका हवी असते व गोदो आपली सुटका करण्यासाठी आला आहे, अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे ते गोदोचा छळ सहन करतात. दीदी व गोगो या या दोघांच्या सुटकेसाठी गोदो विविध प्रलोभने दाखवतो. परंतु ती केवळ आभासीच ठरते. शेवटी मात्र गोगो व दीदीला असे वाटू लागते, की गोदो आला नसता तर बरे झाले असते. गोदो म्हणजे माणसाची आशा, आशा कधीही संपणारी नसते हेच ‘गोदो वन्स अगेन’चे सूत्र आहे.

लेखनाच्यादृष्टीने जेव्हा आपण एखाद्या गाजलेल्या कलाकृतीवर आधारित नाट्य लिहित असतो, तेव्हा स्वतःचे भाष्य करीत त्यातील आशय-विषयाच्या पुढे जाणे अपेक्षित असते. मात्र याबाबतीत लेखक भगवान हिरे कमी पडतात. दिग्दर्शक पंकज सनेर यांनी तांत्रिक बाजूंवर केलेला विचार आणि कलावंतांकडून करवून घेतलेली मेहनत जाणवत होती.

प्रकाशयोजनेत केलेला रंगसंगतीचा, शॅडोंचा वापर प्रसंगानुरूप प्रयोगात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात तसेच गोगो (प्रवीण मोरे), दीदी (शुभम गुडा) व गोदो ४ (ऐश्वर्या खोसे) यांच्या प्रसंगानुरूप खुलत गेलेल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रयोग रंगत गेला. त्यांना गोदो १, गोदो २ (केशव भगत), गोदो ३ (प्रदीप जांभूळकर), मुलगा (दीपक ढाके) यांनी साथ दिली. मात्र प्रयोग रंगत असतानाच ‘गोदो १’च्या प्रवेशानंतर प्रयोग काहीसा रेंगाळल्यासारखा वाटला.

तंत्राच्या बाबतीत रोशन वाघ यांचे नेपथ्य, अतुल बऱ्हाटे यांची प्रकाशयोजना प्रयोगास पूरक अशी तर मोहित कांबळे, रोशन भगत यांचे पार्श्वसंगीत प्रयोग प्रभावी करणारे. ज्योती चंद्रमोरे यांची रंग व वेशभूषा नाट्यास साजेशी.

नेपथ्य सहाय्य मोहित कांबळे, विजय वाघ, नितीन सोनवणे, अरविंद काळे, स्वप्नील जाधव यांचे, तर रंगमंच व्यवस्था प्रगती गिते, नितीन सोनवणे, विजय वाघ, गणेश तायडे, स्वप्नील जाधव यांची. एकंदरीत उत्तम तंत्राच्या आधारे कलावंतांच्या अभिनयाने रंगलेला प्रयोग सादर केल्याबद्दल भुसावळ थर्मल पॉवर स्टेशनच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT