Central team officials inspecting the buffalo herd of farmer Sanjay Dokhe.  
जळगाव

Jalgaon News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा; चाळीसगाव तालुक्यात केंद्रीय पथकाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: तालुक्यात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. सर्वत्र चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली. बहुतांश भागात पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. विहिरी कोरड्याठाक पडल्या.

अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने गुरुवारी (ता. १४) प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील बिलाखेड, डोणदिगर, हिरापूर, शेवरी, रोहिणी व खडकी या दुष्काळी गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांच्याकडे व्यथा मांडत भरपाईची मागणीही केली. (Drought inspection by central team in Chalisgaon taluka jalgaon news)

केंद्रीय पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त एच. आर. खन्ना, सांख्यिकी विभागाचे सहाय्यक संचालक जगदीश शाहू यांचा पथकात समावेश होता. त्यांच्याबरोबर अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी महेश औताडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. गर्जे, चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे उपस्थित होते.

पथकाने बिलाखेड येथील शेतकरी नीलाबाई अनिल चौधरी यांच्या मका पिकाची, तर चंद्रकांत किसन चौधरी व भीमराव बाजीराव दरेकर यांच्या कपाशी पीकक्षेत्राची पाहणी केली. आपल्या व्यथा पथकाकडे मांडताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते.

डोणदिगर येथील शेतकरी बारकू शिवराम मोरे, भाऊसाहेब काशीनाथ पाटील यांच्या कपाशीच्या शेतात, हिरापूर येथील शेतकरी आबा रामदास देवरे, मीनाबाई भानुदास जगताप यांच्या कपाशी, सुदाम पंडित निकुंभ यांच्या केळीच्या शेतात, तर शेवरी येथील शेतकरी रामकृष्ण गुलाब राठोड व निंबा नथ्थू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात पाहणी केली. खडकी बुद्रुक येथील शेतकरी संजय उत्तम डोखे यांच्या म्हशींच्या गोठ्याची पाहणी करताना चाऱ्यासाठी कसे हाल होत आहेत, हे पथकाने प्रत्यक्ष अनुभवले. परिसरातील पाझर तलावांचीही पाहणी करण्यात आली.

विहिरी, तलाव कोरडेठाक

यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात एकदाही मोठा पाऊस झाला नाही. काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडल्या असल्या, तरी त्याचा पिकांना फायदा झाला नाही. खरीप अथवा रब्बी हंगामात कोणतीही पिके बहरली नाहीत. कापसासह केळीचे पीक जळू लागले आहे. सध्या या भागात पाण्याची पातळी खूप खोलवर गेली. विहिरी, कूपनलिका, पाझर तलाव कोरडे पडले आहेत. चारा व पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी आर्त मागणी शेतकऱ्यांनी पथकाकडे केली.

"चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडलेला असल्याने येथील परिस्थिती किती गंभीर आहे, याची पाहणी करण्यासाठी आम्हाला केंद्र सरकारने पाठवले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी करून आमचा अहवाल आम्ही शासनाला सादर करणार आहोत. त्यानंतर पुढील निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल." - एच. आर. खन्ना, केंद्रीय पथकातील अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT