crime news  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जुन्या वादातून नशिराबाद-कंडारीत राडा; ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : कंडारी (ता. जळगाव) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी होऊन दोन्ही गटांतील लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी रविवारी (ता. २४) एकाच कुटुंबावर नशिराबाद पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Due to an old dispute 2 groups clashed and people from both groups were injured jalgaon crime news)

नशिराबाद पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे कंडारी गावातील सेवालाल महाराज मंदिराच्या ओट्यावर रविवारी (ता. २३) सायंकाळी सातला बादल लक्ष्मण परदेशी आणि त्याचा शेजारी शेखर जैसवाल जाधव असे दोन जण गप्पा मारत बसले होते. त्या वेळी गावातील प्रशांत पाटील, मयूर सुर्वे, सुनील सुर्वे, हर्शल बाविस्कर आणि अक्षय राजेंद्र पाटील यांनी जुने भांडण उकरून काढले.

आमच्या भांडणात तूच मध्यस्थी केल्याच्या रागातून बादल परदेशी व शेखर जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. जातीवरून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. भांडण सुरू असताना बादलचा भाऊ आकाश परदेशी, आई कुसुमबाई परदेशी, जिजाबाई राजू मोरे, गंगूबाई पूनमसिंग मोरे यांना देखील पाचही लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याप्रकरणी बादल परदेशी यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रशांत पाटील, मयूर सुर्वे, सुनील सुर्वे, हर्शल बाविस्कर आणि अक्षय राजेंद्र पाटील (सर्व रा. कंडारी, ता. जि. जळगाव) अशा पाच जणांविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक गजानन देशमुख तपास करीत आहेत.

ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

तक्रारदार शेखर जाधव याने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्याचा मित्र बादल परदेशी याच्या सोबत गावातील प्रशांत पाटील यांच्यात जुन्या कारणावरून हाणामारी होत असताना शेखर जाधव याने वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता, प्रशांत पाटील, मयूर सुर्वे, अनिल सुर्वे, हर्शल बाविस्कर, अक्षय राजेंद्र पाटील यांनी भांडणानंतर जाधव यांच्या घरावर हल्ला चढवून मध्यस्थी का केली म्हणत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT