holidays
holidays  esakal
जळगाव

Jalgaon News : शासकीय कार्यालये 5 दिवस बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दिवाळीनिमित्त महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये पाच दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीसणानिमित्त परगावातील नोकरदार मंडळी आपापल्या गावी रवाना झाले आहेत.

काहींनी पाच दिवसाव्यतिरिक्त अतिरिक्त सुट्या घेऊन कुलू-मनाली, सिमला, काश्‍मीर, आग्रा, गोवा येथे जाण्याचे नियोजन केले आहे.( due to diwali Government offices will be closed for five days jalgaon news )

दिवाळीनिमित्त शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसह नोकरदार वर्गाची गेल्या दोन -तीन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी धामधूम सुरू आहे. वसूबारस पूजनाने शुक्रवारी (ता. १०) दीपोत्सवास प्रारंभ झाला.

त्यातच शनिवार (ता. ११) व रविवार (ता.१२) नोव्हेंबरला विकेंड आहे. सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १४) दिवाळी पाडवा, बुधवारी (ता.१५) यमद्वितीया अर्थात भाऊबीज आहे.

शनिवार आणि रविवार आणि लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सलग येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जळगाव महापालिका कार्यालये पाच दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसह अधिकारी सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. काहींनी आपल्या गावाकडे शुक्रवारी वाट धरली आहे.

जिल्हा परिषद शाळांना १६ दिवस सुट्ट्या

जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांना देखील ११ ते २५ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या लागलेल्या आहेत. २६ नोव्हेंबरला रविवार आहे. २७ ला गुरुनानक जयंती असल्याने शासकीय सुट्टी आहे.

त्यामुळे २८ नोव्हेंबरला शाळा उघडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची दिवाळी जोरात होणार आहे. परगावचे शिक्षक गावाकडे रवाना झाले आहेत. तर स्थानिक ठिकाणी असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी दिवाळीच्या खरेदीचा आनंद लुटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: विंडिजविरुद्ध PNG च्या सेसे बाऊचं विक्रमी अर्धशतक, तर रसेलचा IPL नंतर वर्ल्ड कपमध्येही गोलंदाजीत जलवा

Loksabha Election Result : भाजपचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला; मतमोजणीसंदर्भात केल्या या 'चार' मागण्या

BJP President : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपचा अध्यक्ष बदलणार; 'या' तीन नावांची आहे चर्चा

Lok Sabha Election Result : सत्ता आल्यास पहिल्या १०० दिवसात काय करणार? लोकसभेच्या निकालापूर्वी PM मोदींची अधिकाऱ्यांसोबत खलबतं

Exit Poll Result: खरंच ४०० पार! देशात यापूर्वी झालं होतं शक्य; कसं अन् कधी वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT