drowning death esakal
जळगाव

Jalgaon News : पोहताना तरूणाला आल्या फिट अन... तापीच्या डोहात मित्रांदेखत दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव शहरातील जैनाबाद-कांचननगर परिसरातील रविंद्र कोळी हा तरुण सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. सोमवारी (ता. २९) रात्री धामणगाव येथे तो मित्रांसोबत हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता. (due to epilepsy Death of a young man by drowning jalgaon news)

रात्रभर तेथेच मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत गावाजवळ असलेल्या तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. नदीत पोहता येत असल्याने तो एकटाच पाण्यात पोहण्यासाठी उतरला.

नदीपात्रात पोहत असताना अचानक फिट आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊच्या सुमारास धामणगावजवळील तापी नदीपात्रात घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र आत्माराम कोळी (वय ३०, रा. जैनाबाद, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचे दोघे मित्र काही अंतरावर बसलेले होते. पाण्यात पोहत असताना अचानक रविंद्रला फिट आल्याने तो पाण्यात बुडू लागला. या वेळी नदीपात्राच्या दुसऱ्या तिरावर असलेल्या ग्रामस्थांना तरुण बुडत असल्याचे दिसताच त्यांनी आरडा-ओरड करत बोंब ठोकली. त्यामुळे समोरच बसलेल्या त्याच्या मित्रांना ही बाब लक्षात आली.

त्यांनी तातडीने पाण्यात रविंद्रच्या दिशेने उड्या घेत त्याला बाहेर काढले व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी धाव घेतली. त्याच्या पोटातून पाणी काढण्याचा आणि कृत्रीम श्‍वासोश्‍वास देण्याचाही प्रयत्न झाला.

रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. रविंद्रच्या मागे आई आहे. याघटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार ईश्‍वर लोखंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT