Collector Ayush Prasad while giving instructions in the meeting of Social Justice- Tribal Development Department. Neighboring CEO Ankit etc. esakal
जळगाव

Jalgaon News: आदिवासी विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

महाबळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक शुक्रवारी (ता.१२) झाली.

सकाळ वृत्तसेवा

जळगा : सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांसाठी विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विभागाने भर द्यावा.

अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी येथे दिल्या. (Effective implementation of tribal development schemes Collector Ayush Prasad Jalgaon News)

महाबळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक शुक्रवारी (ता.१२) झाली.

यावल उप वनसंरक्षक जमिर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजेश एस.लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार आदी उपस्थित होते.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, मुख्याधिकाऱ्यांनी शहर व नगरपालिका स्तरावरील जातिवाचक वस्त्यांची नावे तत्काळ बदलण्याबाबत कार्यवाही करावी. पंचायत समिती व नगरपालिकेने रमाई आवास, मोदी आवास व नमो ११ सूत्री कार्यक्रमांबाबत तत्काळ उद्दिष्टे पूर्ण करावे.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध समित्यांमधील जिल्हा दक्षता समिती, रमाई आवास घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, नमो अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची वस्ती सन्मान अभियान, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करणे, नमो अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची वस्ती सन्मान अभियान योजनेतंर्गत निवडलेल्या गावांची सद्यःस्थिती व जिल्ह्यातील गावांची/वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची योजना,

आदिवासी विकास विभागातर्गंत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजना, पेसा ग्रामपंचायतीचा आढावा, वनहक्क कायदा अंतर्गत प्राप्त वैयक्तिक व सामुहिक वनहक्क दावे, शबरी आदिवासी घरकुल योजना, जिल्हा सल्लागार महिला समिती आढावा व स्वाभिमान सबलीकरण योजनांची अंमलबजावणी अशा विषयांचा आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT