Eknath Khadse- Girish Mahajan esakal
जळगाव

Eknath Khadse : सासरच्या ग्रामपंचायतीत महाजनांचा पराभव; एकनाथ खडसे यांचा टोला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्याचे नेते असलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना त्यांचे सासर असलेली पळसखेडा बुद्रुकची ग्रामपंचायतही राखता आली नाही. त्यात राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकविला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सोमवारी (ता. ९) पत्रकारांशी बोलताना लगावला.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाबाबत प्रथमच खडसेंनी भाष्य केले. सर्वच ठिकाणी पैसा फेकून मतं विकत घेता येत नाही, अशी टीका भाजपवर निशाणा साधताना केली. याबाबत बोलताना खडसे म्हणाले, की राज्याचे नेते व पॉवरफुल मंत्री गिरीश महाजन यांना त्यांचे सासर असलेल्या पळसखेड्यातही यश आले नाही.

चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालय संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. एवढे होऊनही आमदार मंगेश चव्हाण यांच्या पॅनलचा मोठा पराभव झाल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील प्रकल्प कधी पूर्ण होणार?

जळगाव जिल्ह्यासह खानदेशात अनेक प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांविषयी माझ्याशिवाय जिल्ह्यातील एकाही आमदाराने विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केले नाही.

सिंचन प्रकल्प पूर्ण झाले पाहिजेत, यासाठी आपली सुरवातीपासूनची तळमळ राहिली आहे. मात्र, एकही लोकप्रतिनिधीविषयी बोलत नसून त्यांनी चुप्पी साधलीय. लोकप्रतिनिधी बोललेच नाही, तर हे प्रकल्प पूर्ण कधी होणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Saibaba Darshan: विधानसभा निकालापूर्वी विजय थालापतीचे साईदर्शन; शिर्डीत चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत संस्मरणीय भेट

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

SCROLL FOR NEXT