eknath khadse and sharad pawar esakal
जळगाव

Eknath khadse : राजकीय विजनवासातून बाहेर काढणाऱ्या शरद पवारांना कसा सोडेन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: मी राजकीय विजनवासात असताना शरद पवार यांनी मला साथ देऊन बाहेर काढले. त्यांनी आमदारकीसाठी राज्यपाल कोट्यातून नाव दिले. त्या ठिकाणी काम झाले नाही, त्यानंतर मला विधान परिषदेत उमेदवारी देऊन आमदार केले. अशा स्थितीत आपण त्यांना सोडून कसे जाणार? माझ्या भाजपप्रवेशाच्या चर्चेचा बिनपैशांचा तमाशा आपण पाहताय, मीही पाहतोय अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(eknath khadse on bjp entry ncp sharad pawar jalgaon latest marathi news)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आलेले असताना मुक्ताईनगर येथील जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना म्हटले होते, की एकनाथ खडसे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले होते. ते कशासाठी भेटले होते? हे लक्षात घ्या.

यानंतर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर खडसे भाजपमध्ये पुन्हा परत जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पक्षाचे नेते शरद पवार यांना आपण भेटलो तेव्हा सांगितले, की मला केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घ्यायची आहे. त्या वेळी ते म्हणाले, ठीक आहे, मी त्यांच्या भेटीची वेळ ठरवितो. आपण दोघे मिळून त्यांची भेट घेऊ.

स्वतः शरद पवार यांनी आपल्या सोबत भेटीची तयारी दर्शविली होती. याला एक महिना झाला. कामाच्या व्यस्ततेमुळे ते शहा यांची अपॉइंटमेंट घेऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही अद्यापही भेट घेतलेली नाही; परंतु आम्ही भेटीला जाणार आहोत, हे निश्‍चित आहे.

शरद पवार माझ्या सोबत भेट घेणार आहेत तर ते काय याला भारतीय जनता पक्षात घ्या सांगणार आहेत काय? असा प्रश्‍न करून खडसे म्हणाले, आमदार चंद्रकांत पाटील यांना जळी-स्थळी खडसेच दिसत असल्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा ते पसरवीत असतात. आपण चर्चेचा बिनपैशांचा तमाशा पाहात आहोत.

ज्या पवारांनी मला राजकीय विजनवासातून बाहेर काढले त्यांना सोडून आपण कसे जाऊ शकतो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. या सर्व वावड्या असून, अशा अनेक चर्चा यापुढेही पसरविल्या जातील, हेही ध्यानात घ्या. अशा चर्चांना कुणीही मनावर घेऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT