eknath khadse statement about ajit pawar media trial esakal
जळगाव

Eknath Khadse : अजित पवार आवडीचे, त्यामुळे मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) मीडियाच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की अस्वस्थता वाढते. (eknath khadse statement about ajit pawar media trial jalgaon news)

त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’ करण्यात आली, असे मत माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह भारतीय जनता पक्षात जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की यात कोणतेही तथ्य नाही.

अजित पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन ‘जोपर्यंत माझ्यात जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीचे काम करत राहणार’, असे जाहीर केले आहे. त्यामुळे हा विषय संपला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अजित पवार यांच्यावर मीडियाचे प्रेम आहे. ते त्यांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगितले जाते, तसेच कधी नाथाभाऊवरही प्रेम असते.

दिसलो नाही, की ‘नॉट रिचेबल’ आहेत, असे सांगितले जाते. अजित पवार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाची ही ‘मीडिया ट्रायल’ होती. आता हा प्रश्‍न सुटला आहे. अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार आहेत, ते कोठेही जाणार नाहीत, हे त्यांनीच स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT