Eknath Khadse criticize bjp party over minority people buldhana politics sakal
जळगाव

Eknath Khadse : जिल्हा बँकेच्या सभेत शेतकरीहिताचे निर्णय : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मागील सभा कोरम अभावी तहकूब झाली होती, आजही या सभेसाठी सत्ताधारी गटातील केवळ सात संचालक उपस्थित होते. (Eknath Khadse statement about district bank meeting Decisions jalgaon news)

मात्र, आमचे तब्बल नऊ संचालक उपस्थित होते. कोरम पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर निर्णय घेतला. अशी माहिती संचालक आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आमदार खडसे म्हणाले, कि शेतकरी हिताच्या प्रस्तावांना आमच्या संचालकांनी मंजूरी दिली. काही प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. सभासदांना जिल्हा बँकेतर्फे थेट कर्ज वाटप करण्यात येत होते. त्याबाबत शेतकऱ्यांची नाराजी होती. आम्हीही त्याला विरोध करून विविध कार्यकारी सोसायटीतर्फे कर्ज वितरण करण्यात यावे, असा प्रस्ताव दिला व तो मंजूर करण्यात आला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?

तसेच, शेतकऱ्यांना एटीएमद्वारे संपूर्ण कर्ज न देता, ५० टक्के रोखीने देण्याचा प्रस्तावही आम्हीच दिला. तो एकमताने मंजूर झाला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कर्ज प्रश्‍नही आम्हीच मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सिमेलगत राहणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूरीसाठी आम्हीच दिला. आता ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी जिल्ह्याच्या सिमेबाहेरही असतील, अशा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतर्फे कर्ज मिळणार आहे.

...तर पाचोऱ्याच्या सभेस उपस्थिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे २३ एप्रीलला सभा होत आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून आपण या सभेला उपस्थित राहणार काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्तेही सहकार्य करीत आहेत. निमंत्रण आल्यास आपणही या सभेला उपस्थित राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT