Eknath Khadse statement latest maharashtra political news esakal
जळगाव

हिंदुत्वाच्या मुद्यावर पक्ष सोडला, मग मंत्रिपदासाठी भांडणे का? : खडसेंचा टोला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेनेने (Shiv sena) हिंदुत्व मुद्दा सोडला त्यामुळे आम्ही त्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे.

जर त्यांचा हिंदुत्वाचाच मुद्दा आहे तर मग आता मंत्रिपदासाठी हेच आमदार भांडणे का करीत आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज येथे लगावला. (Eknath Khadse statement about shinde government jalgaon Latest Maharashtra political news)

जळगाव येथे शुक्रवारी (ता.१५) पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, की हिंदुत्वाच्या मुद्यावर बाहेर पडून त्यांनी भाजपशी युती केली, की उद्धव ठाकरे यांच्यावरच्या नाराजीमुळे पक्ष सोडला. आमचे विकास कामे होत नाही म्हणून आम्ही बाहेर पडतो आहोत असे सांगण्यात आले.

अशी वेगवेगळी कारणे प्रत्येक आमदाराकडून सांगण्यात आली. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या कारणांबाबत कुठेही एकमत दिसलेले नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा मानला तर आता या बंडखोर आमदारांनी मंत्रिमंडळात आम्हाला घ्या हे सांगण्याची काही गरजच नाही. हिंदुत्वावर आले ना, मग हिंदुत्व हेच तुमचे ध्येय असले पाहिजे.

मग त्यासाठी मंत्री कशाला व्हायला पाहिजे. त्यामुळे या बंडखोराचा हिंदुत्व हा केवळ सांगण्यासारखा प्रकार दिसतो आहे. त्यांचे पक्षातून बाहेर पडण्याचे अनेक वेगवेगळे मुद्दे असल्याने त्यांच्या कोणतेही एकमत नसल्याचे दिसत आहे. आता त्यांनी पक्षातून बाहेर पडल्याचे कारण सांगताना एकमत करण्याची गरज आहे.

तात्पुरती स्थगिती असावी

राज्यातील सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या नियमाला दिलेल्या स्थगितीबाबत बोलताना ते म्हणाले, की कोणतेही नवीन सरकार आले तर ते जुन्या सरकारच्या कामांना स्थगिती देते.

परंतु या ठिकाणी काही निर्णयाला स्थगिती दिली ती तात्पुरती असावी, असे मला वाटते कारण औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास दिलेली स्थगिती दिलेली तात्पुरती असावे, असे मला वाटते कारणे हे प्रश्‍न अत्यंत भावनिक असतात.

त्यामुळे हे निर्णय सरकारला परत घ्यावे लागतील, असे माझे मत आहे. मात्र जर विकास कामांना स्थगिती देवून ते रद्द केले तर सार्वजनिक कामे थांबतील व जनतेचे फार मोठे नुकसान होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT