Hartala (Muktainagar): NCP leader, MLA Eknath Khadse speaking in a meeting organized during Jansamvad Yatra.  esakal
जळगाव

Eknath Khadse Statement : सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : गेली तीस वर्षे मतदारांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तीस वर्षांत सर्व जाती धर्माला घेऊन सर्वसमावेशक विकासाचे राजकारण केले. राजकारण करताना कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आजकालचे राजकारण बदलले आहे.

सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांची सभा होऊ दिली नाही. सत्ताधाऱ्यांनी अशाप्रकारे सभा रद्द करून विरोधकांचा आवाज दाबण्यापेक्षा सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती, असा आरोप एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर केला आहे. (Eknath Khadse Statement Attempt by rulers to suppress voice of opposition Jalgaon News)

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेच्या ३२ व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द, हरताळा येथे माजी महसूल मंत्री खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद सभा झाली. याप्रसंगी आमदार खडसे म्हणाले, की मतदारसंघात अनेक विकासकामे केली.राहिलेली विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी आतापर्यंत जशी साथ दिली ती साथ कायम राहू द्या, असे त्यांनी आवाहन केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, बंगालीसिंग चितोडिया, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदीप साळुंखे, समाधान कार्ले, यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, अतुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT