District Milk Union esakal
जळगाव

Eknath Khadse Statement : दूध संघातील गैरव्यवहार तपासात उघड होईलच

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रशासकीय मंडळाच्या कार्यकाळात झाला आहे. याबाबत आम्ही गुन्हा दाखल करावा, यासाठी न्यायालयात खटला दाखल केला आहे. पोलिस तपास केल्यानंतर, चौकशीनंतर सर्व प्रकार उघड होईल, असा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदासाठी शनिवारी (ता. १०) मतदान होणार आहे. याबाबत जळगावात त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, चोपडा बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार पाटील उपस्थित होते. (Eknath Khadse Statement Malpractices in milk union will revealed in investigation Jalgaon News)

आमदार खडसे म्हणाले, की संघातील अखाद्य तूप व लोणी चोरीचा प्रकार प्रशासकीय मंडळाच्या कार्यकाळात झाला आहे. संचालक मंडळाची त्याला मंजुरीही नाही. याबाबत आम्ही तक्रार दाखल दिली आहे. ती दाखल करून घ्यावी, यासाठी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमच्या तक्रारीची पोलिस चौकशी झाल्यास तपासातून सर्व सत्य उघड होईलच.

जिल्हा दूध संघाच्या प्रचाराबाबत बोलताना ते म्हणाले, की मतदारांना कोणत्याही आरोप प्रत्यारोपाबाबत रस नाही. त्यांचा विकासावर विश्‍वास आहे. आम्ही सात वर्षांच्या कार्यकाळात जो विकास केला आहे. त्याच्यावर मतदारांचा विश्‍वास असून, तो मतदानातून समोर दिसेल. विरोधकांकडे खोके आहेत, त्यांचा ते वापर करतील. ते सत्तेत असून, त्या सत्तेचा ते वापर करतील. पंधरा दिवसांच्या प्रचाराचा विजय होतो, की एका रात्रीचा विजय होतो, ते मतमोजणीत मतदार दाखवून देतील.

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांनी आपल्याविरुद्ध तक्रार केली, म्हणून माझी ईडीची चौकशी सुरू आहे. याबाबत बोलताना खडसे म्हणाले, की आमदार मंगेश चव्हाण यांच्याबाबत आपण कोणतीही तक्रार केलेली नाही. तक्रार करणाऱ्याचे नाव त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

सहकार पॅनलचाच विजय : गुलाबराव देवकर

जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर म्हणाले, की गेल्या सात वर्षांत दूध संघात केलेली कामे मतदारांसमोर आहेत. त्यामुळे आमच्या सहकार पॅनलचा विजय निश्‍चित आहे. आमच्याकडे सहकारात विश्‍वास आहे. विरोधकाकडे फारसा अनुभव नाही. त्यामुळे निश्‍चितच आमचा गट विजयी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT