Eknath Khadse News esakal
जळगाव

Eknath Khadse : ‘केळी विम्याचे पैसे देऊ नका’, असा उल्लेख पत्रात असेल तर राजीनामा देऊ : एकनाथ खडसे

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse : ‘रसलपूर (ता. रावेर) येथील चार शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या शेतीवर दुसऱ्यांनीच विमा काढल्याचे निदर्शनाला आणल्यावर मी त्याची चौकशी करण्याची विनंती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली.

यात केळी पीकविम्याचे पैसे देऊ नका, असा कुठेही उल्लेख नाही. ( Eknath Khadse statement on banana insurance jalgaon news)

तसा उल्लेख असल्याचे मुक्ताईनगरच्या आमदारांनी सिद्ध केल्यास आपण राजीनामा देऊ, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी दिले. रावेर बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज चौथ्या दिवशी खडसेंच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

केळी पीकविम्याप्रकरणी एकनाथ खडसे यांनीच खोडा घातल्याचा आरोप मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, की केळी पीकविमा मिळावा, यासाठीच आपण पाठपुरावा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे देऊ नये, असे कसे म्हणू शकतो. आमदारांचे आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

माझ्याकडे रावेर तालुक्यातील रसलपूर येथील चार शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या शेतीवर दुसऱ्यांनीच विमा काढल्याचे निदर्शनाला आणल्यावर मी त्याची चौकशी करण्याची विनंती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना केली. यात केळी पीकविम्याचे पैसे देऊ नका, असा कुठेही उल्लेख केलेला नाही. तसा उल्लेख असल्याचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध केल्यास आपण राजीनामा देण्यास तयार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT