Eknath Khadse News esakal
जळगाव

Eknath Khadse News: रोहित पवार यांची 2 पासून संवाद यात्रा : एकनाथ खडसे

शरद पवार यांची सभाही जंगी सभा होणार

सकाळ वृत्तसेवा

Eknath Khadse News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची येत्या ५ सप्टेंबरला येथील सागर पार्कवरील सभा जंगी होईल. त्या दृष्टीने पक्षाची तयारी सुरू आहे.

दरम्यान, सभेपूर्वी येत्या २ सप्टेबरपासून आमदार रोहित पवार यांची जिल्ह्यात संवाद यात्रा होणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी दिली. (Eknath Khadse statement Rohit Pawars Samvad Yatra from 2 september jalgaon political)

शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त श्री. खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी या वेळी उपस्थित होते. आमदार खडसे म्हणाले की, जळगाव येथील सागरपार्क मैदानावर शरद पवार यांची ५ सप्टेंबरला सभा होणार आहे.

जिल्हाभरातून सभेसाठी हजारो लोक येतील, असा अंदाज आहे. सद्यस्थितीत शेतीची कामे सुरू असल्याने नागरिकांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही ही सभा जोरदार होईल. सभेसाठी जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, श्री. पवार यांच्या याच सभेच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांची २ सप्टेंबरपासून जिल्ह्यात संवाद यात्रा असणार आहे.

जिल्ह्यात ते ५ सप्टेबरपर्यंत राहणार असून, विविध तालुक्यांत जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत (कै) आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित पाटील, सक्षणा सलगर, जयदेव गायकवाड असतील.

भुजबळांचा निषेध

बीड येथील सभेत राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टिका केली. त्यावर खडसे म्हणाले, कि शरद पवार व छगन भुजबळ यांनी एकत्र काम केले आहे.

दोघांना एकमेकांविषयी माहिती आहे. शरद पवार यांनी गेल्या साठ वर्षाच्या राजकारणात अनेकांना घडविले आहे. भुजबळ यांनाही त्यांनीच घडविले आहे.

त्यामुळे त्यांच्याकडून शरद पवार यांच्याविषयी अशा वक्तव्याची अपेक्षा नाही. आपण भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT