Girish Mahajan Pankaja Munde  Sakal
जळगाव

Girish Mahajan : खाते वाटप अन् पंकजा मुंडेंबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

Girish Mahajan On Pankaja Munde : ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत विराजमान झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शिंदे गटातील नू आणि भाजपमधील नऊ अशा 18 जणांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्यापर्यंत या सर्वांना खातं वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना मंत्रिमंडळात पहिल्याच विस्तारात स्थान देण्यात आलेल्या भाजपच्या गिरीश महाजन यांनी खातं वाटप आणि पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान केलं आहे. ते जळगाव येथे बोलत होते.

महाजन म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला असून, 17 ऑगस्टच्या अधिवेशनापूर्वी खाते वाटप होणार आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे जळगाव येथे बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने नाराज असलेल्या पंकजा मुंडेंबाबत विचारले असता ते म्हणाले की, पंकजा मुंडेंना मोठं पद मिळेल, पक्षश्रेष्ठी विचार करतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्ताराला नक्कीच उशीर झाला आहे. मात्र, आता खाते वाटपला उशीर होणार नाही. स्वातंत्र्य दिनासाठी आम्हाला सर्वांना झेंडावंदन करण्यासाठी जिल्हा वाटप करून देण्यात आले आहे. खाते वाटपासाठी आता निश्चित असं काही सांगता येणार नाही. मात्र, विस्तार झाला असून, 17 ऑगस्टला अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी खाते वाटप होऊ शकते. कारण, अधिवेशनामध्ये मंत्र्यांना त्या विभागाशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरं देखील द्यावी लागणार आहे. तसेच त्याचा अभ्यासह करावा लागेल. त्यामुळे मला नाही वाटतं की खाते वाटपाला जास्त उशीर होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस लवकरच योग्य निर्णय घेतील असे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंकजा मुंडेंबाबत काय म्हणाले महाजन

मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज झालेल्या पंकजा मुंडेंनी ‘पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल. मात्र, जेव्हा वाटेल तेव्हा ते देतील,’ या भावना व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. यावर यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, पंकजा मुंडे नेमकं काय बोलल्या आहेत हे अद्याप बघितलेले नाही. मात्र, निश्चित त्या नाराज असल्याचे वाटत नसून, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी नक्कीच गांभीर्याने विचार करतील आणि मोठं पद दिले जाईल. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत असं काहीही म्हणण्याचं कारण नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT