Vacant space in Phule market after encroachment removal After some time, this place gets encroached again
Vacant space in Phule market after encroachment removal After some time, this place gets encroached again esakal
जळगाव

Jalgaon : पोलीस मिळेना, अतिक्रमण हटेना!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील फुले मार्केटमध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण वाढते आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमणधारकांतही वाद होत आहेत, तर अतिक्रमण हटविण्यसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष होत आहे. दुसरीकडे महापालिकेने मागणी करूनही पोलिस बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे आता कर्मचारी बिथरले आहेत. महापालिकेचे अधिकारी केवळ आदेश देऊन सुस्त राहत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील फुले मार्केट मध्यवर्ती बाजाराचे केंद्र आहे. या ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असते, मात्र याच मार्केटमध्ये विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. सणासुदीच्या दिवसांत तर अतिक्रमण अधिकच वाढते. त्यामुळे नागरिकांनाही रहदारीस त्रास होत आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे.(Encroachment happening again after action Jalgaon news)

महापालिकेतर्फे कारवाई, पण...

महापालिकेवर फुले मार्केटमधील अतिक्रमणावर दोन दिवसांपासून कारवाई सुरू आहे. कर्मचारी असेपर्यंत अतिक्रमणधारक दुकाने लावत नाहीत. मात्र ते त्या ठिकाणाहून हलले की पुन्हा दुकाने लावून अतिक्रमण केले जाते. हा खेळ फुले मार्केटमध्ये दिवसभर सुरू असतो.

कर्मचारी-अतिक्रमणधारक संघर्ष

फुले मार्केटमध्ये अतिक्रमणधारक हटविल्यानंतर पुनःपुन्हा येतात. त्यामुळे अतिक्रमणधारक व कर्मचारी यांच्यात संघर्ष होतो, अनेक वेळा अतिक्रमणधारक कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावूनही गेले आहेत. त्यामुळे मोठा वादही झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताचीही मागणी केली जात आहे.

पोलिस बंदोबस्त मिळेना

महापालिकेतर्फे अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याबाबत शहर पोलिस ठाण्याला वेळोवेळी पत्र देण्यात आले आहे. मात्र पोलिस बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यास अडथळ निर्माण होत आहे. विशेष म्हणजे फुले मार्केटचे अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी पोलिस विभागाचे महापालिकेला पत्र दिले जाते; परंतु बंदोबस्त दिला जात नाही, असेही महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

"फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमण हटविण्यासाठी आम्हाला पोलिसांचेही पत्र आहे. तसेच नागरिकांकडूनही मागणी आहे. मात्र आम्ही कारवाईला गेलो तर अतिक्रमणधारक थेट अंगावर येतात. त्यामुळे आम्ही पोलिस बंदोबस्तासाठी मागणी करणारे पत्र वेळोवेळी दिले आहे. मात्र आम्हाला बंदोबस्त मिळत नाही. त्यामुळे पूर्णपणे कारवाई करणे शक्य होत नाही."

-सुनील ठाकूर, अधीक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग,

महापालिका, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT