जळगाव

Jalgaon News: नीलकमल रुग्णालयाजवळील अतिक्रमण हटवले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नीलकमल रुग्णालयामधील डॉक्टरांशी रस्त्यावरच्या नारळपाणी विक्रेत्याने वाद केला होता. महापालिकेतर्फे या रुग्णालयाच्या परिसरातील सर्व अतिक्रमण हटवण्यात आले आहेत. (Encroachment near Neelkamal Hospital removed jalgaon news)

शहरातील जुने आठवडे बाजार ते सिंधी कॉलनी रस्त्यावर असलेल्या नीलकमल रुग्णालयामध्ये रुग्ण तपासणीस आलेल्या एका डॉक्टरांशी वाहन लावण्यावरून रस्त्यावर नारळपाणी विक्री करणाऱ्या विक्रेत्याने वाद घातला आणि त्यांना मारहाण केली.

या प्रकरणामुळे रस्त्यावरील अतिक्रमणधारकांच्या मुजोरीबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. महापालिकेने त्याची दखल घेऊन रुग्णालयाच्या परिसरातील नारळपाणी विक्रेत्यांची गाडी जप्त केली. या परिसरातील चहा टपऱ्यांसह सर्व अतिक्रमण हटवण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक उमेश नष्टे म्हणाले, की महापालिका आयुक्तांनी या रुग्णालय परिसरातील अतिक्रमण ताबडतोब हटवण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आले. नारळपाणी विक्रेत्यांची गाडी जप्त करण्यात आली आहे. पुढे सिंधी कॉलनी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT